नेहमी अपयश का येतं? कुठेतरी, काहीतरी चुकतंय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 11:14 IST2025-05-25T11:13:42+5:302025-05-25T11:14:41+5:30

काम नको पण..: काहीही न कमावता सर्व काही मिळायला हवं, अशी मानसिकता.

why does failure always happen something is wrong somewhere | नेहमी अपयश का येतं? कुठेतरी, काहीतरी चुकतंय!

नेहमी अपयश का येतं? कुठेतरी, काहीतरी चुकतंय!

आपण मेहनत करतो, वेळ देतो, प्रयत्नही सातत्याने करतो... पण तरीही अपेक्षित यश आपल्या हातातून निसटते. मग प्रश्न पडतो – नेमकं चुकतंय तरी कुठे आणि काय? अपयश हे केवळ नशिबावर किंवा परिस्थितींवर अवलंबून नसते, तर आपल्या दैनंदिन सवयींवर, विचारांवर आणि दृष्टिकोनावरही ते अवलंबून असते. कोणत्या सवयी आपल्या अपयशाचे दार उघडतात? चला यात बदल करूया...

काम नको पण..: काहीही न कमावता सर्व काही मिळायला हवं, अशी मानसिकता.

आरोप करणे : स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता सतत इतरांवर आरोप करणे.

इतरांना दोष देणे : टीका करणे, इतरांवर सतत दोषारोप करून स्वतःचा विकास थांबवणे.

मला सर्व येते : सर्वज्ञानी असल्याच्या अहंकारात राहणे. नवीन शिकण्याची गरज न वाटणे.

श्रेय घेणे : यशाचे पूर्ण श्रेय घेणे. टीमवर्क न मानणे आणि इतरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे.

वेळेचा गैरवापर होतो का? : दिशाहीन आणि व्यर्थ करमणुकीत वेळ घालवणे.

पळ काढणे : संकटात बदल स्वीकारण्याची भीती. नवीन गोष्टींपासून पळ काढणे.

माहीत नाही : स्वतःला काय हवंय हेच न ठरवू शकणे. स्पष्ट ध्येय नसणे.

पूर्वग्रह : राग धरून ठेवणे. ज्यामुळे मानसिक शांतता हरवते.

मी का सांगू : ज्ञान शेअर न केल्याने टीम व स्वतःचाही विकास खुंटतो.  स्वतःपुरती माहिती ठेवणे. 

गॉसिप्स : दुसऱ्यांबद्दल सतत बोलणे. विचार करण्याऐवजी गॉसिपमध्ये वेळ घालवणे.

वेंधळेपणा : दैनंदिन कामांची यादी न ठेवणे. आत्मपरिक्षण व नियोजनात कमीपणा असणे.

सटकते : राग, चिडचिड, असंतोष यामुळे सहकार्य, नेटवर्किंग व आत्मविकास यात अडथळे.

Web Title: why does failure always happen something is wrong somewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.