IAS Officer Salary: जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 06:33 PM2022-05-03T18:33:09+5:302022-05-03T18:34:27+5:30

आयएएस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पगाराव्यतिरिक्त, अनेक प्रकारच्या सुविधा आणि समाजात जबरदस्त मान-सन्मान मिळतो. याशिवाय, आयएएस अधिकाऱ्याकडे  बरेच अधिकारही असतात. याचा वापर ते प्रशासन चालविण्यासाठी करतात.

what is the salary and facilities of an IAS officer check the details IAS officer salary  | IAS Officer Salary: जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा

IAS Officer Salary: जाणून घ्या, किती असतो एका आयएएस अधिकाऱ्याचा पगार, मिळतात 'या' लक्झरीअस सुविधा

googlenewsNext

आयएएस अधिकारी पदाची नोकरी ही देशातील सर्वात चांगली नोकरी मानली जाते. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना भारतीय नागरी सेवेत (IAS) सामील होण्याची संधी मिळते. दरवर्षी लाखो उमेदवार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन नागरी सेवा परीक्षा देतात. खरे तर, उत्कृष्ट पगाराव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्यांना अनेक प्रकारच्या  सुविधा आणि समाजात जबरदस्त मान-सन्मान मिळतो. याशिवाय, आयएएस अधिकाऱ्याकडे  बरेच अधिकारही असतात. याचा वापर ते प्रशासन चालविण्यासाठी करतात.

आयएएस अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं?
पदवीनंतर उमेदवार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. आयएएस होण्यासाठी सर्वप्रथम यूपीएससीची पूर्व परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पास झायानंतर मेन्स परीक्षा असते. यूपीएससी परीक्षेची शेवटची स्टेज म्हणजे, इंटरव्ह्यू असतो. या तीनही स्टेज पार केल्यानंतर, मेरिट लिस्टमध्ये आलेल्या उमेदवारांची निवड होते. यात ज्या उमेदवारांचा रँक सर्वात चांगला असतो, त्यांना आयएएस सेवा अॅलॉट केली जाते.

किती असतो आयएएस अधिकाऱ्याचा पगार? 
एका आयएएस अधिकाऱ्याला सुरुवातीला 7 व्या वेतन आयोगानुसार, महिन्याला 56100 रुपये एवढा मूळ पगार (बेसिक सॅलरी) दिला जातो. याशिवाय त्यांना विविध प्रकारचे भत्ते दिले जातात. यानंतर, त्यांचा एकूण पगार जवळपास 1 लाख रुपये महीन्यापर्यंत पोहोचतो. एवढेच नाही, तर वेळेनुसार त्यांच्या पगारात वाढ होत जाते. जेव्हा एखादा आयएएस अधिकारी कॅबिनेट सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचतो, तेव्हा ज्याला जवळपास 2,50,000 रुपये प्रती महिना, एवढा पगार दिला जातो. कॅबिनेट सेक्रेटरी हे आयएएस अधिकारी रँकचे सर्वात मोठे पद आहे. सर्वाधिक पगारही याच पदासाठी मिळतो.

आयएएस अधिकाऱ्याला मिळतात 'या' खास सुविधा -
एका आयएएस अधिकाऱ्याला उत्तम पगाराशिवाय विविध प्रकारच्या उत्कृष्ट सुविधाही मिळतात. त्यांना राहण्यासाठी बंगला, घरातील कामासाठी कर्मचारी आणि सरकारी कार मिळते. एवढेच नाही, तर आयएएस अधिकाऱ्यांना सुरक्षाही दिली जाते. त्यांचा सरकारी प्रवासही विनामूल्य असतो. याशिवाय, त्यांना अनेक प्रकारचे प्रशासकीय अधिकार दिले जातात. ज्याचा वापर ते परिस्थितीनुसार करू शकतात.

Web Title: what is the salary and facilities of an IAS officer check the details IAS officer salary 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.