सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! TRAI मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया; दीड लाखांपर्यंत पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 14:55 IST2022-01-15T14:54:38+5:302022-01-15T14:55:49+5:30
TRAI मध्ये कोणत्या पदांसाठी आहे भरती, किती मिळणार पगार, शेवटची तारीख काय? जाणून घ्या...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! TRAI मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया; दीड लाखांपर्यंत पगार
नवी दिल्ली: कोरोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू सावरताना पाहायला मिळत असून, खासगीसह अनेकविध सरकारी कंपन्यांमध्येही नोकरीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यातच आता मोबाइल कंपन्यांसाठी नियम करणारी आणि नियंत्रण असलेली सरकारी कंपनी TRAI मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोणत्या पदांसाठी आहे भरती, किती मिळणार पगार, शेवटची तारीख काय? जाणून घ्या...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India, TRAI) ने सल्लागार, वरिष्ठ सल्लागार आणि यंग प्रोफेशनलच्या विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या रिक्त पदांसाठी TRAI ने नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले सर्व उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवारांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. वयोमर्यादेशी संबंधित माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
विविध पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता
कन्सल्टंट इंटरनॅशनल रिलेशन्स डिव्हिजनसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. तर, सिनिअर कन्सल्टंट फायनान्शियल आणि विभागासाठी उमेदवार सीए/आयसीडब्ल्यूए/ कॉस्ट आणि मॅनेजमेंट यासोबतच संबंधित कामाचा २० वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसेच सिनिअर कन्सल्टंट ब्रॉडकास्ट आणि केबल सर्व्हिस पदांसाठी अर्ज करण्यासाठी, बिझनेस अॅडमिनिस्ट्रेश/इकोनॉमिक्स/कॉमर्स/इंजिनीअरिंग/सायन्स/लॉ या विषयात मास्टर किंवा बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय सल्लागार (टेक) ग्रेड I पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे आणि यंग प्रोफेशनल पदांसाठी, टेक्नोलॉजीतील पदव्युत्तर/तंत्रज्ञान पदवी/कॉम्प्युटरसायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/आयटी/टेलिकॉममधील इंजिनिअरिंग डिग्री आणि किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, असे सांगितले जात आहे.
किती मिळणार पगार, शेवटची तारीख काय?
कन्सल्टंट इंटरनॅशनल रिलेशन विभागात १ पद रिक्त असून त्यासाठी ६५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. सिनिअर कन्सल्टंट ब्रॉडकास्ट अॅण्ड केबल सर्व्हिसचे १ पद असून यासाठी दरमहा दीड लाख रुपये पगार दिला जाईल. तसेच सिनिअर कन्सल्टंट ब्रॉडकास्ट अॅण्ड केबल सर्व्हिसचे १ पद रिक्त असून त्यासाठी ८० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. कन्सल्टंट (टेक) ग्रेड I चे १ पद भरले जाणार असून त्यासाठी ८० हजार रुपये दरमहा पगार दिला जाणार आहेत. तर यंग प्रोफेशनलचे १ पद भरले जाणार असून त्यासाठी ६५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
दरम्यान, यासाठी उमेदवारांना TRAI च्या अधिकृत वेबसाइट www.trai.gov.in ला वर जावे लागेल. भरतीशी संबंधित अधिक तपशील वेबसाइटवर देण्यात आला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे.