शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

वेगळ्या नाेकऱ्या आहेत, तुम्ही तयार आहात का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 09:29 IST

चांगल्या पॅकेजसाठी नोकरी बदलणे, करिअर बदलणे अगदी सहज घडते. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान नवीन संधी निर्माण करीत आहे; पण हे जरी सकारात्मक चित्र असलं, तरी रोजगार आपोआप निर्माण होणार नाही. 

डॉ. दीपक शिकारपूरउद्योजक, संगणक साक्षरता प्रसारकजघडीला आपला भारत देश एका संक्रमण अवस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत, ते पूर्णपणे दिसेनासे झालेले नाहीत. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खऱ्या अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पैसा नव्हे, तर विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे म्हणजे स्किल्ड मॅनपॉवर. माझ्या दृष्टीने ‘आयटी’ या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे इंडियन टॅलेंट्स.. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे. करिअर ही पदवीधर व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. विसाव्या शतकात (१९७० पर्यंत) कुठलाही पदवीधर नोकरी मिळवू शकत होता. अनेकांना सरकारी नोकरी सुरक्षित म्हणून प्राधान्याने आवडत होती. अनेक व्यक्ती ‘एक नोकरी, एक करिअर’ असा विचार करीत होती.

ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्या धाेक्यातचांगल्या पॅकेजसाठी नोकरी बदलणे, करिअर बदलणे अगदी सहज घडते. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान नवीन संधी निर्माण करीत आहे; पण हे जरी सकारात्मक चित्र असलं, तरी रोजगार आपोआप निर्माण होणार नाही. त्यासाठी आपण पात्र आहोत का, हा विचार पदवीधरांनी केला पाहिजे. ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रातल्या हजारो नोकऱ्या येत्या पाच ते दहा वर्षांत संपुष्टात येऊ शकतात. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कपातही होतेय. उद्योग-व्यवसायांत या गोष्टी होत राहणार. त्याची दुसरी बाजूही आहे. सायबर सुरक्षा, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक नवीन नोकऱ्या किंवा कामे उपलब्ध होतील. ज्या तंत्रज्ञानामुळे काही काळ बेरोजगारी वाढते तेच तंत्रज्ञान राबविण्यासाठी कालांतराने रोजगार उत्पन्न होतात, हे त्रिकालबाधित सत्य आपण स्वीकारले पाहिजे.

कौशल्य हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे; पण परीक्षा, गुण व पदवीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या विसाव्या शतकातील शिक्षण पद्धतीला अजून त्याचे महत्त्व कळलेले नाही. अनेक धुरिणांना कौशल्य म्हणजे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याची शिक्षणपद्धती असेच वाटते. हीच खरे तर शोकांतिका आहे. एकीकडे शिकलेल्या लोकांना रोजगार मिळत नाही, तर दुसरीकडे उद्योग-व्यापाराला योग्य माणसे मिळत नाहीत. हा आपल्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे. शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेज, परीक्षा, घोकंपट्टी आणि अखेर पदवी हे आपल्या मनावर आतापर्यंत कोरलेले चित्र पुसण्याची आता वेळ आली आहे. पदवी कौशल्य कार्यानुभव = करिअर हे एकविसाव्या शतकातले समीकरण जितक्या लवकर शिक्षण पद्धतीला उमजेल तितक्या लवकर पदवीधर बेरोजगारांची समस्या सोडवली जाईल. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीही लवचिक आणि बदलत्या गरजा वेगाने सामावून घेणारी असायला हवी. गुणांना (मार्क्स) कमी महत्त्व देऊन मूल्यांकनाला जास्त महत्त्व द्यायला हवे. 

उद्योगाला सुसंगत अभ्यासक्रम विकसित करणे, तो शिकवणे हे अतिशय अवघड काम आजच्या शिक्षण पद्धतीला करावे लागत आहे. यामध्ये माजी विद्यार्थी, उद्योग, समुपदेशक, मार्गदर्शक (मेंटॉर्स) या सर्व घटकांना अंतर्भूत करावेच लागेल. कारण हे सर्व काम शिक्षक करू शकणार नाहीत. इथेच आपल्याला व्हर्च्युअल पद्धतीचा अवलंब करावा लागेलच. 

२०२४ मध्ये आयटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील, तरीही उमेदवारांना स्पर्धात्मक राहण्यासाठी कठोर परिश्रम आणि योग्य कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि क्लाउड कॉम्प्युटिंगसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे नवीन रोजगारनिर्मिती होत आहे. 

आगामी शतकाच्या करिअर वेधचे कोष्टक विसावे शतक             एकविसावे शतकपरीक्षा                   कौशल्य मूल्यांकनपदवी                    नूतन प्रमाणपत्रअनुभव                   कार्यानुभव व अद्ययावत प्रमाणपत्रसुरक्षित नोकरी         असुरक्षित रोजगारमर्यादित उद्योजक      स्टार्टअप संस्कृतीभांडवल                  अभिनव कल्पनाजमीनजुमला            उपयुक्त माहितीचा साठा 

टॅग्स :jobनोकरी