तरुणांसाठी मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये 400 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:41 IST2025-12-24T18:40:46+5:302025-12-24T18:41:15+5:30
बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

तरुणांसाठी मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये 400 पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती...
Bank Job: बँकिंग क्षेत्रात करिअरची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) ने अप्रेंटिसशिप भरती 2025 संदर्भातील अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत 2025-26 साठी 400 अप्रेंटिस पदांवर उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, ही भरती देशातील विविध राज्यांमध्ये होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा निश्चित मासिक वेतन मिळेल.
अर्ज प्रक्रिया 25 डिसेंबरपासून सुरू
बँक ऑफ इंडिया अप्रेंटिसशिप 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 25 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
कोणत्या राज्यांत मिळणार संधी?
या भरतीअंतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये आसाम, बिहार, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, दिल्ली आदी राज्यांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि झारखंड या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत.
पात्रता काय आहे?
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे.
पदवी पूर्ण करण्याचा कालावधी 1 एप्रिल 2021 ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानचा असावा.
अर्ज करताना पदवीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा
किमान वय : 20 वर्षे
कमाल वय : 28 वर्षे
उमेदवाराचा जन्म 2 डिसेंबर 1997 पूर्वीचा आणि 1 डिसेंबर 2005 नंतरचा नसावा.
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
अर्ज शुल्क
अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले आहे.
वेतन किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत दरमहा 13,000 रुपये वेतन दिले जाईल. यातील 8,500 रुपये बँक ऑफ इंडियाकडून आणि 4,500 रुपये केंद्र सरकारकडून DBT (Direct Benefit Transfer) द्वारे मिळतील. मात्र प्रशिक्षण काळात कोणतेही अतिरिक्त भत्ते किंवा सुविधा दिल्या जाणार नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
निवड प्रक्रिया
अप्रेंटिसशिपसाठी निवड प्रक्रिया बँक ऑफ इंडिया आणि NATS (National Apprenticeship Training Scheme) च्या नियमांनुसार केली जाईल.
यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या विविध शाखांमध्ये प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात येईल.
अर्ज कसा कराल?
सर्वप्रथम www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
नवीन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करा.
Bank of India Apprenticeship 2025 हा पर्याय निवडा.
वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज शुल्क भरून फॉर्म अंतिमतः सबमिट करा.