CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 07:20 IST2025-06-15T07:19:03+5:302025-06-15T07:20:52+5:30

Exams: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

Registration for BBA, BCA, BMS exams begins from CET room | CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 

CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस  परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आता सुरू झाली आहे. यापूर्वी या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा सीईटी परीक्षा देण्यासाठी २० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 

सीईटी सेलने २९ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा घेतली होती. त्यात ६१,६६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून या अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये जवळपास १ लाख ५ हजार जागा आहेत. त्यातूनही परीक्षा दिलेल्यांपैकी निम्म्याच विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले असल्याने अनेक कॉलेजांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार आहेत. त्यामुळे  यापूर्वी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. दरम्यान, परीक्षेची तारीख नोंदणी प्रक्रियेनंतर जाहीर केली जाणार आहे. 

यापूर्वी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा देऊ न शकलेले विद्यार्थी नव्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करु शकतील. त्याचबरोबर यापूर्वी सीईटी परीक्षा दिली आहे, मात्र पुन्हा सीईटी परीक्षा देण्याची इच्छा आहे या विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात आली आहे. यापूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे दोन्ही सीईटी परीक्षांपैकी ज्या परीक्षेत सर्वोत्तम पर्सेंटाईल गुण असतील ते प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील.

Web Title: Registration for BBA, BCA, BMS exams begins from CET room