शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती

By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 3:42 PM

मुंबईत सर्वाधिक जागा

ठळक मुद्देमुंबईत सर्वाधिक जागादहावीपेक्षा अधिक शिक्षण असलेल्या उमेदवारांचा अर्ज करता येणार नाही

Reserve Bank of India Recruitment 2021 : १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पुन्हा एकदा एक सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल २४१ जागांसाठी भरती केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेत सिक्युरिटी गार्ड या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२१ ही आहे. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार असून ती फेब्रुवरी अथवा मार्च महिन्यात घेण्यात येईल. देशातील १८ शहरांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसंच उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. २४१ पैकी ३२ जागा या एससी, ३३ जागा एसटी आणि ४५ जागा ओबीसी वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त ईडब्ल्यूएससाठी १८ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ११३ जागा असतील. १८ ते २५ या वयोगटातील उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. तसंच ओबीसी वर्गासाठी तीन वर्षांची तर एससी, एसटी वर्गासाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे. १० वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसंच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थांना यासाठी अर्ज करता येणार नाही. अर्ज करणारा उमेदवाराचं १ जानेवारी २०२१ पर्यंत पदवीपेक्षा कमी शिक्षण असणं आवश्यक आहे. 

सर्वप्रथम उमेदवारांची निवड ही ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे केली जाईल. त्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणी केवळ उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्याचे गुण मेरिटमध्ये घेतले जाणार नाहीत. अंतिम यादी ही ऑनलाईन लेखी परीक्षेच्या आधारेच तयार केली जाणार आहे. लेखी परीक्षेत, रिजनिंग, जनरल इंग्लिश, न्यूमरिकल एबिलिटीशी निगडीत प्रश्न विचारले जातील. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकjobनोकरीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र