रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या ११ हजार+ जागांवर भरती, पात्रता काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 18:07 IST2026-02-24T18:05:41+5:302026-02-24T18:07:13+5:30

Railway ALP Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.

Railway ALP Recruitment 2026: 11 thousand+ posts of Assistant Loco Pilot, what are the qualifications..? | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या ११ हजार+ जागांवर भरती, पात्रता काय..?

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या ११ हजार+ जागांवर भरती, पात्रता काय..?

Railway ALP Recruitment 2026: रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी नव्या भरतीला हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयानंतर भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रक्रिया रेल्वे भरती मंडळ (RRB) मार्फत राबवली जाणार आहे. 

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि अधिसूचना (नोटिफिकेशन) जाहीर होताच उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती मोहिमेत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण ११,१२७ पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तांत्रिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या आणि रेल्वेचा भाग होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, ALP हे रेल्वेमधील जबाबदारीचे आणि महत्त्वाचे पद आहे.

झोननिहाय पदांचा तपशील

RRB ने झोननिहाय पदांची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार...

  • मध्य रेल्वे: १,४०० पदे
  • पूर्व मध्य रेल्वे: ७०० पदे
  • पूर्व तटीय रेल्वे: १,६२५ पदे
  • पूर्व रेल्वे: ६०८ पदे
  • उत्तर मध्य रेल्वे: ४५७ पदे
  • उत्तर रेल्वे: ७४० पदे
  • दक्षिण पूर्व रेल्वे: १,५३१ पदे (सर्वाधिक)
  • ईशान्य सीमांत रेल्वे: १,२७६ पदे

याशिवाय दक्षिण रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे तसेच इतर झोनमध्येही पदे निश्चित करण्यात आली आहेत. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्येही काही पदांचा समावेश आहे.

कोण अर्ज करू शकतो?

  • ALP पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे...
  • मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण
  • ITI पूर्ण केलेले उमेदवार पात्र
  • १०वीसह इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेले उमेदवार पात्र
  • इंजिनिअरिंग पदवी (Degree) असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात

वयोमर्यादा

किमान वय: १८ वर्षे

कमाल वय: ३० वर्षे

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल—

OBC: ३ वर्षे

SC/ST: ५ वर्षे

माजी सैनिक आणि इतर आरक्षित प्रवर्गांना लागू नियमांनुसार सवलत

अर्ज शुल्क

सामान्य व इतर प्रवर्ग: ५०० रुपये

SC/ST, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): २५० रुपये

निवड प्रक्रिया

  • CBT-1 (संगणक आधारित परीक्षा)
  • CBT-2
  • CBAT (संगणक आधारित कौशल्य/क्षमता चाचणी)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच अंतिम निवड केली जाईल.

अर्ज कधी सुरू होणार?

सध्या अर्जाच्या तारखांची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, RRB कडून लवकरच सविस्तर नोटिफिकेशन जाहीर होण्याची शक्यता आहे. या अधिसूचनेत अर्जाच्या तारखा, परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक आणि इतर महत्त्वाची माहिती दिली जाईल. उमेदवारांनी RRBच्या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे नजर ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Web Title : रेलवे में नौकरी का सुनहरा अवसर: 11,000+ सहायक लोको पायलट भर्ती

Web Summary : रेलवे मंत्रालय ने 11,127 सहायक लोको पायलट पदों की घोषणा की। आरआरबी के माध्यम से जल्द ही ऑनलाइन आवेदन स्वीकार किए जाएंगे। 10वीं/आईटीआई/डिप्लोमा/डिग्री धारक, 18-30 वर्ष के उम्मीदवार आवेदन कर सकते हैं। चयन में सीबीटी, दस्तावेज़ सत्यापन और चिकित्सा परीक्षा शामिल हैं। तिथियों के साथ आधिकारिक अधिसूचना का इंतजार है।

Web Title : Railway Job Opportunity: 11,000+ Assistant Loco Pilot Vacancies Announced

Web Summary : The Railway Ministry announced 11,127 Assistant Loco Pilot vacancies. Online applications will be accepted soon through RRB. Candidates with 10th/ITI/Diploma/Degree can apply, aged 18-30. Selection involves CBTs, document verification, and medical examination. Official notification with dates is awaited.