देशसेवेची संधी! ITBP-CRPF-BSF मध्ये 55 हजार जवानांची मेगा भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:04 IST2026-03-19T15:03:56+5:302026-03-19T15:04:54+5:30
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 53 नवीन बटालियन सुरू होणार.

देशसेवेची संधी! ITBP-CRPF-BSF मध्ये 55 हजार जवानांची मेगा भरती
Central Forces: राष्ट्रीय सेवेत करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय तिबेट बटालियन पोलीस (ITBP), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF) आणि इतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मध्ये सैनिकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
तब्बल 55 हजार सैनिकांच्या भरतीचा प्रस्ताव असून, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये (CAPF) 53 नवीन बटालियन सुरू करण्याची योजना आहे. यासंदर्भातील प्रस्ताव CAPF ने गृह मंत्रालयाला पाठवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जात असून, लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर 55 हजार सैनिकांची भरती करण्यात येणार आहे.
CRPF मध्ये 22 हजार बदांची भरती
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती नुकतीच राज्यसभेत मांडण्यात आली आहे. गृहविभागाशी संबंधित स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. राधामोहन दास यांनी या संदर्भातील अहवाल राज्यसभेत मांडला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, CAPF मध्ये 53 नवीन बटालियन तयार करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे, ज्या अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये 20 नवीन बटालियन तयार करण्याचा प्रस्ताव आहे. 20 नवीन अतिरिक्त बटालियनच्या निर्मितीमुळे सीआरपीएफमध्ये 22 हजार सैनिकांची भरती केली जाईल. अशाप्रकारे 55 हजार जवानांपैकी केवळ 22 हजार जवानांची सीआरपीएफमध्ये भरती होणार आहे.
याशिवाय, उर्वरित बटालियन BSF, ITBP, SSB आणि आसाम रायफल्ससह इतर CAPF मध्ये स्थापन करायच्या आहेत. SSB मध्ये एक सेक्टर आणि 12 नवीन बटालियन तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे बीएसएफमध्ये दोन अतिरिक्त सेक्टर आणि 12 नवीन बटालियन तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे आसाम रायफल्समध्येही 5 नवीन बटालियनच्या निर्मितीसाठी मंजुरी मागितली आहे. अशाप्रकारे ITBP सह इतर CAPF मध्ये 33 हजार सैनिकांची भरती केली जाईल.