शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

Mega recruitment of Railways : रेल्वेची मेगा भरती, 90 हजार जागांसाठीच्या परीक्षेला लवकरच सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 3:50 PM

रेल्वेने 90 हजार पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या 89,409 पदासाठी रेल्वे अर्ज मागवले होते. त्यासाठी 2.37 कोटी अर्ज आले आहेत.

मुंबई - रेल्वेने 90 हजार पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. त्यासाठी 9 ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात होत आहे. रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या 89,409 पदासाठी रेल्वे अर्ज मागवले होते. त्यासाठी 2.37 कोटी अर्ज आले आहेत. या पदांसाठी तीन टप्प्यात भरतीप्रकिया पार पडेल. याबाबत Railway Recruitment Control Board च्या वेबसाईटवर 26 जुलैपासून भरतीची माहिती देण्यात येणार आहे.

रेल्वेने जाहीर केलेल्या जवळपास 90 हजार जागांपैकी पहिल्या टप्प्यात 26,502 जागा भरल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ ही पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या परीक्षेसाठी 9 ऑगस्टला सुरुवात होत आहे. मात्र, परीक्षेचे ई-कॉल लेटर 5 ऑगस्टपासून परीक्षार्थींना डाऊनलोड करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 26 जुलैपासून संबंधित परीक्षेची माहिती मिळविण्यासाठी रेल्वेच्या वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. 26 जुलैपासून परीक्षेसंदर्भातील सर्वच माहिती या साईटवर वेळोवेळी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

परीक्षेचे स्वरुप - रेल्वेची ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी परीक्षार्थींना 60 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. तर दिव्यांगांना 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. परीक्षेत चार पर्याय असलेले एकूण 75 प्रश्न विचारले जातील. पण, चुकीचे उत्तर दिल्यास एक तृतीयंश गुण वजा होणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थींनी काळजी घेणे आवश्यक आहे.

अॅडमीट कार्ड -परीक्षार्थींना रेल्वे रिक्र्युटमेंट बोर्डाच्या वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध होईल. त्यानंतर rrbcd.gov.in या वेबसाईटवरुन तुमचे अॅडमीट कार्ड तुम्हाला घेता येईल.    

टॅग्स :Railway recruitment 2018रेल्वेभरतीrailwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वे