गुगलमध्ये नोकरीची संधी! कॉम्प्युटर सायन्स पदवी असेल तर ६० लाखांपेक्षा जास्त पगार मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 02:08 PM2023-11-16T14:08:35+5:302023-11-16T14:09:06+5:30

गुगलमध्ये नोकरी करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देतं असतं, गुगल पगारही सुरुवातीपासून मोठा पगार देतं.

Job opportunity in Google! A computer science degree will fetch a salary of more than 60 lakhs | गुगलमध्ये नोकरीची संधी! कॉम्प्युटर सायन्स पदवी असेल तर ६० लाखांपेक्षा जास्त पगार मिळणार

गुगलमध्ये नोकरीची संधी! कॉम्प्युटर सायन्स पदवी असेल तर ६० लाखांपेक्षा जास्त पगार मिळणार

गुगलमध्येनोकरी करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देतं असतं, गुगल पगारही सुरुवातीपासून मोठा पगार देतं. Google त्याच्या सोशल मीडिया आणि जॉब प्लॅटफॉर्मवर नोकऱ्यांशी संबंधित पोस्ट शेअर करतं. सध्या गुगलने नोकरीसाठी जाहीरात शेअर केली आहे. 

Google मध्ये काम करू इच्छिणारे तरुण google.com/careers किंवा LinkedIn वर रिक्त जागा तपासू शकतात. Google ने बेंगळुरू, भारत येथे असलेल्या त्यांच्या कार्यालयासाठी उत्पादन व्यवस्थापक पदासाठी अर्ज करण्यासाठी जाहीरात केली आहे. यासाठी आवश्यक पात्रता, कौशल्ये आणि नोकरीचे तपशील देखील शेअर केले आहेत. निवडलेल्या उमेदवारांना ६० लाखांपेक्षा जास्त वेतन मिळू शकेल.

ॲक्शन, इमोशन आणि..., टीम इंडियाचे विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन; पाहा Inside Video

गुगल मॅप्समध्ये व्यवस्थापक पदासाठी नोकरी

सध्या अनेकजण Google Maps वापरतात. याद्वारे त्यांचा मार्ग किंवा कोणतेही विशिष्ट ठिकाण शोधतात. यावरुन खूप मदत होते. Google Maps साठी उत्पादन व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. Google Maps मध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून, एखाद्या व्यक्तीला पुढील गोष्टी कराव्या लागतील -

1- कंटेंट मॉडरेशन टीम टीम (रिव्यू, मीडिया) सोबत काम करेल. तसेच Google Maps साठी अशा नवीन मॉडरेशन सिस्टीम लाँच करत आहे, ज्यामुळे वापरकर्ता अनुभव आणि नकाशे डेटा गुणवत्ता सुधारू शकते.

2- वापरकर्ता माहिती काढण्यासाठी आणि मशीन लर्निंग सिस्टमवर काम करण्यासाठी क्रॉस Google मॉडेलिंग टीमसोबत भागीदारी करून.

3- डेटा गुणवत्ता सुधारण्यासाठी डेटा लेबलिंग टीमसोबत काम करणे.

Google मध्ये नोकरीसाठी आवश्यक पात्रता


- कॉम्प्युटर सायन्समधील बॅचलर पदवी, किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्र, किंवा या पदवींशी समतुल्य व्यावहारिक अनुभव.

उत्पादन व्यवस्थापनात २- १० वर्षांचा अनुभव.
- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव.

Google मध्ये नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये 

1- डेटा विश्लेषण कौशल्यांवर मजबूत पकड.
2- उत्कृष्ट लेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये.
3- Google Maps (पुनरावलोकन, फोटो, संपादन) मध्ये योगदान देण्यात स्वारस्य.

पगार किती मिळेल?

सर्व मोठ्या कंपन्यांच्या विविध पदांच्या वेतनाचा उल्लेख एम्बिशन बॉक्स नावाच्या वेबसाईटवर करण्यात आला आहे. त्यांच्या मते, भारतात गुगल प्रॉडक्ट मॅनेजरचा पगार ६२ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तुमच्याकडे वर नमूद केलेली पात्रता असल्यास गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज करा. लिंक्डइनवर नोंदवलेल्या माहितीनुसार, या पदासाठी २०० हून अधिक लोकांनी अर्ज केले आहेत.

Web Title: Job opportunity in Google! A computer science degree will fetch a salary of more than 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.