महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी, ३ हजार ४६६ पदांसाठी भरती; या आहेत अटीशर्ती, असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 09:24 AM2021-08-09T09:24:55+5:302021-09-25T15:20:32+5:30

job in Maharashtra health department: महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

job in Maharashtra health department, recruitment for 3466 posts; These are the conditions | महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी, ३ हजार ४६६ पदांसाठी भरती; या आहेत अटीशर्ती, असा करा अर्ज

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी, ३ हजार ४६६ पदांसाठी भरती; या आहेत अटीशर्ती, असा करा अर्ज

Next

मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागामध्ये एकूण ३ हजार ४६६ जागांसाठी भरती होणार आहे. ड गटासाठीच्या या नोकरभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. (job in Maharashtra health department) या भरतीप्रक्रियेसाठी पात्र असलेल्या उमेदवांरांना ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ९ ऑगस्टपासून अर्ज दाखल करून घेण्यासा सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख ही २२ ऑगस्ट २०२१ ही आहे. (job in Maharashtra health department, recruitment for 3466 posts; These are the conditions )

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये ड गटातील ३ हजार ४६६ जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी निघालेल्या जाहीरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमधून उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. आज ९ ऑगस्टपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले जाणार आहेत.  
या भरती प्रक्रियेमधून अहमदनगर, धुळे, नाशिक, रायगड, पालघर, ठाणे, जळगाव, परभणी, जालना, सांगली, रत्नागिरी कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, नंदुरबार, बुलडाणा, नांदेड, बीड, अकोला, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, हिंगोली, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, नागपूर, यवतमाळ,   वाशीम आदी जिल्ह्यांमधील ड प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत.   

Web Title: job in Maharashtra health department, recruitment for 3466 posts; These are the conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app