JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास असणाऱ्यांसाठी BSF मध्ये 2788 जागांसाठी भरती, मिळणार 69100 रुपये पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 17:09 IST2022-01-16T16:53:56+5:302022-01-16T17:09:32+5:30
Border Security Force Recruitment : सीमा सुरक्षा दल येथे लवकरच दहावी उत्तीर्ण उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे.

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास असणाऱ्यांसाठी BSF मध्ये 2788 जागांसाठी भरती, मिळणार 69100 रुपये पगार
नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. सीमा सुरक्षा दल (Border Security Force Recruitment) येथे लवकरच दहावी उत्तीर्ण उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीचं नोटीफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कान्स्टेबल ट्रेडमॅन या पदांसाठी मोठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर म्हणजेच rectt.bsf.gov.in वर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2022
या पदांसाठी होणार भरती
कान्स्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) - एकूण जागा 2788
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
कान्स्टेबल ट्रेडमॅन या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त किंवा शासनमान्य संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना दोन किंवा एक वर्षाचा संबंधित ट्रेडमधील अनुभव आवश्यक आहे किंवा उमेदवारांनी ट्रेडमधील ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी निवडीसाठीच्या सर्व अटी शर्थी आणि पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 वर्षे ते 23 वर्षे या दरम्यान असणं आवश्यक आहे.
पगार
कान्स्टेबल ट्रेडमॅन (Constable Tradesman) - 21,700 ते 69,100 रुपये प्रतिमहिना
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.