JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध विभागात भरती; मिळणार 3.5 लाख पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 16:25 IST2022-09-15T16:11:22+5:302022-09-15T16:25:12+5:30
IPPB Recruitment 2022 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने विविध व्यवस्थापकीय पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे.

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध विभागात भरती; मिळणार 3.5 लाख पगार
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या पोस्ट विभागांतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने विविध व्यवस्थापकीय पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने 8 सप्टेंबर 2022 रोजी या भरतीसाठी एक जाहिरात जारी केली होती. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध विभागांमध्ये भरती होत आहे.
टेक्नोलॉजी, प्रोडक्ट, ऑपरेशन्स, रिस्क मॅनेजमेंट आणि फायनान्स विभागामध्ये असिस्टेंट जनरल मॅनेजर (एजीएम), चीफ जनरल मॅनेजर (सीजीएम), सीनियर मॅनेजर आणि मॅनेजर ही पदं भरली जातील. तसेच टेक्नोलॉजी, कॉम्प्लायन्स आणि ऑपरेशन्स डिपार्टंमेट्समध्ये डिप्टी जनरल मॅनेजर (डीजीएम), चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर आणि इंटर्नल ऑम्बुड्समॅन या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल.
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार IPPB ची अधिकृत वेबसाईट ippbonline.com वर भरती विभागात दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड करू शकतात. तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता.
अर्ज करण्यासाठी, सर्व प्रथम, उमेदवारांना त्यांचे नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे नोंदणी करावी लागेल. यानंतर, आपण प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून आपला अर्ज सबमिट करू शकता.
शेवटची तारीख
या पदांसाठी 10 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 24 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतील.
अर्जाची फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 750 रुपये भरावे लागतील. SC, ST आणि दिव्यांग यांसारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
किती मिळेल पगार?
1. स्केल 7 पदं - रु. 3.5 लाख प्रति महिना
2. स्केल 6 पदं - रु. 3.13 लाख प्रति महिना
3. स्केल 5 पदं - रु.2.53 लाख प्रति महिना
4. स्केल 4 पदं - रु. 2.13 लाख प्रति महिना
5. स्केल 3 पदं - रु. 1.79 लाख प्रति महिना
6. स्केल 2 पदं - रु. 1.41 लाख रुपये प्रति महिना
7.स्केल 1 पदं - रु. 1.12 लाख प्रति महिना