शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये पदवीधरांसाठी बंपर भरती; 1.5 लाखांहून अधिक पगार, जाणून घ्या, डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 3:14 PM

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठीअधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल 995 जागांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या रिक्त जागांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे असे उमेदवार अर्जाची लिंक सक्रिय झाल्यानंतर सदर भरतीसाठी अर्ज करू शकतात. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठीअधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होईल. अर्ज शुल्क आणि अंतिम नोंदणीची तारीख 15 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील. तसेच, अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II कार्यकारी पदावर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. तसेच, राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 

यासोबतच, जनरल आणि ओबीसी, ईडब्ल्यूसी प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये विहित अर्ज शुल्क भरावे लागेल. याशिवाय, एससी, एसटी आणि सर्व महिला प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरली जाऊ शकते. याचबरोबर, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. इतर पात्रता संबंधित माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

दरम्यान, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II एक्झिक्युटिव्हच्या एकूण 995 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 129 पदे आहेत. तसेच, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 133 पदे आणि एससी उमेदवारांसाठी 134 पदे आहेत. याशिवाय, ओबीसींसाठी 222 पदे निश्चित करण्यात आली आहेत. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 377 पदे आहेत. याचबरोबर, या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये वेतन दिले जाईल. तसेच, अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचाही लाभ मिळेल.

असा करता येईल अर्ज...- अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जा.- वेबसाइटवर अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना वाचा.- अर्जाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे, स्वाक्षरी, फोटो, आयडी प्रूफ काळजीपूर्वक अपलोड करा.- त्यानंतर अर्जाची फी भरा.- त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनHome Ministryगृह मंत्रालय