रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या 11000+ पदांसाठी भरती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:48 IST2026-03-17T13:46:53+5:302026-03-17T13:48:26+5:30

Indian Railway Job Notification: अर्ज कधीपासून भरता येणार? वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय? जाणून घ्या...

Indian Railway Job Notification: Recruitment announced for 11000+ posts of Assistant Loco Pilot | रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या 11000+ पदांसाठी भरती जाहीर

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या 11000+ पदांसाठी भरती जाहीर

Indian Railway Job Notification: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली असून, देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये तब्बल 11,127 पदे भरली जाणार आहेत.

अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?

असिस्टंट लोको पायलट पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 मे 2026 पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांना 14 जून 2026 (रात्री 12:00 वाजेपर्यंत) अर्ज करता येणार आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल.

सविस्तर जाहिरात लवकरच

रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही सध्या इंडिकेटिव नोटिस आहे. उमेदवारांना आधीपासून तयारी करता यावी यासाठी ही माहिती देण्यात आली आहे. लवकरच सविस्तर अधिसूचना प्रसिद्ध होणार असून, त्यामध्ये पात्रता, परीक्षा पद्धती, आरक्षण आणि इतर सर्व माहिती दिली जाईल.

पदांची संख्या आणि वयोमर्यादा

या भरती मोहिमेत एकूण 11,127 पदे भरली जाणार आहेत. ही पदे देशातील विविध रेल्वे झोननुसार विभागली जातील. यासाठी किमान वय 18 वर्षे, तर कमाल वय 30 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार आणि सुविधा

निवड झालेल्या उमेदवारांना पे लेव्हल-2 अंतर्गत ₹19,900 इतका प्रारंभिक पगार दिला जाईल. याशिवाय इतर भत्ते आणि सुविधा देखील मिळतील.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील पात्रता पूर्ण केलेली असावी:

  • मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र
  • किंवा
  • मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी

निवड प्रक्रिया कशी असेल?

  • उमेदवारांची निवड अनेक टप्प्यांतून केली जाईल:
  • CBT-1 (कंप्युटर आधारित परीक्षा)
  • CBT-2
  • कंप्युटर आधारित अॅप्टिट्यूड टेस्ट
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
  • मेडिकल टेस्ट

या सर्व टप्प्यांत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच अंतिम निवड दिली जाईल.

Web Title : रेलवे भर्ती: 11000+ सहायक लोको पायलट पदों के लिए सुनहरा अवसर।

Web Summary : भारतीय रेलवे ने 11,127 सहायक लोको पायलट रिक्तियों की घोषणा की। ऑनलाइन आवेदन 15 मई, 2026 से 14 जून, 2026 तक rrbapply.gov.in पर शुरू होंगे। उम्मीदवारों को संबंधित इंजीनियरिंग क्षेत्रों में आईटीआई या डिप्लोमा/डिग्री के साथ 10वीं पास होना आवश्यक है। चयन में सीबीटी-1, सीबीटी-2, एप्टीट्यूड टेस्ट, दस्तावेज़ सत्यापन और मेडिकल टेस्ट शामिल हैं।

Web Title : Railway Recruitment: Golden opportunity for 11000+ Assistant Loco Pilot Posts.

Web Summary : Indian Railways announces 11,127 Assistant Loco Pilot vacancies. Online applications start May 15, 2026, until June 14, 2026, at rrbapply.gov.in. Candidates need a 10th pass with ITI or Diploma/Degree in relevant engineering fields. Selection includes CBT-1, CBT-2, Aptitude test, document verification, and medical test.