IIMC Recruitment 2025: नोकरीची सुवर्णसंधी! आयआयएमसीमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:16 IST2025-10-03T18:14:45+5:302025-10-03T18:16:14+5:30
IIMC Recruitment 2025: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली.

IIMC Recruitment 2025: नोकरीची सुवर्णसंधी! आयआयएमसीमध्ये प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांसाठी भरती
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनने प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट iimc.gov.in ला भेट देऊन अधिसूचना डाउनलोड करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२५ आहे. उमेदवार अधिकृत आयआयएमसीची अधिकृत वेबसाइट iimc.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.
आयआयएमसीने ८ सप्टेंबर २०२५ रोजी या भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा भरल्या जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ६ ऑक्टोबर २०२५ नंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आयआयएमसी भरती २०२५ ही शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.
पात्रता:
- मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयात ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त परदेशी विद्यापीठातून समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी UGC किंवा CSIR द्वारे आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केलेली असावी किंवा, UGC द्वारे मान्यताप्राप्त SLET/SET सारखी तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- ज्या उमेदवारांनी UGC नियमावली, २००९ किंवा २०१६ नुसार पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे, त्यांना NET/SLET/SET मधून सूट मिळू शकते.
अर्ज शुल्क:
सामान्य आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३,००० आहे, तर अनुसूचित जाती, जमाती, अपंगत्व आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क १,५०० आहे. निवड प्रक्रियेत उमेदवारांची पात्रता, अनुभव आणि संबंधित क्षेत्रातील कौशल्य विचारात घेतले जाईल. अधिक माहितीसाठी आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.