ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:48 IST2025-07-01T16:45:18+5:302025-07-01T16:48:55+5:30

ICAI CA Final Result 2025 date Out: सीए अंतिम परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

ICAI CA Result 2025 Date And Time Out, Here How To Check | ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?

ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?

सीए अंतिम परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड पोर्टलेंट्स ऑफ इंडिया या आठवड्यात सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार आहे. याबाबत आईसीएआईकडून अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती.

आयसीएआयने माहिती दिली आहे की, सीए फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनलचे निकाल ६ जुलै २०२५ रोजी जाहीर केले जातील. सीए फायनल मे २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार icai.nic.in आणि icaiexam.icai.org या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे स्कोअरकार्ड तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

सीए फायनल परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक वैयक्तिक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. प्रत्येक गटासाठी एकूण किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आयसीएआय सेंट्रल कौन्सिलचे माजी सदस्य धीरज खंडेलवाल यांची एक पोस्टही व्हायरल झाली होती, ज्यात त्यांनी सीए परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ३-४ जुलैदरम्यान अपेक्षित आहे, असे म्हटले होते.

सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आयसीएआय सदस्यत्वासाठी पात्र असतात. पात्र उमेदवार आयसीएआय कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ शकतात. याशिवाय, त्यांच्या निकालांवर नाराज असलेले उमेदवार पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांकडे त्यांच्या उत्तरपत्रिकेची प्रमाणित प्रत मागण्याचा पर्याय देखील आहे.

Web Title: ICAI CA Result 2025 Date And Time Out, Here How To Check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.