१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयटीबीपीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ८० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 04:56 PM2022-11-23T16:56:41+5:302022-11-23T16:57:59+5:30

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसमध्ये मोठी भरती निघाली आहे. ही भरती ट्रेड्समनच्या पदासाठी आहे, या पदासाठी आता अर्ज करता येणार आहे.

Golden job opportunity itbp constable tradesman recruitment 2022 apply online at recruitment itbpolice | १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयटीबीपीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ८० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन

१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आयटीबीपीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! ८० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन

Next

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीसमध्ये मोठी भरती निघाली आहे. ही भरती ट्रेड्समनच्या पदासाठी आहे, या पदासाठी आता अर्ज करता येणार आहे. यासाठी तुम्हाला आयटीबीपीच्या ऑफिसीअल वेबसाईवर भेट द्यावी लागणार आहे. एकुण २८७ जागांसाठी ही भरती होणार  असून, यासाठी तुम्हाला अगोदर वेबसाईटला भेट देऊन नोटीफीकेशन पाहावी लागणार आहे. 

ITBP ने जारी केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया आज 23 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 22 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, खालील गोष्टींचे पालन करावे लागेल.

Bharat Jodo Yatra: “महात्मा गांधी यांनी जे काम स्वातंत्र्यापूर्वी केले तेच आता राहुल गांधी करत आहेत”


ITBP कॉन्स्टेबलच्या रिक्त जागेसाठी अर्ज असा करा


अर्ज करण्यासाठी, पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जा. वेबसाइटच्या होम पेजवर नवीन भरतीच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर ITBP कॉन्स्टेबल ट्रेडसमन रिक्रूटमेंट 2022 ऑनलाइन फॉर्मच्या लिंकवर जा. पुढील पेजवर विचारलेले तपशील भरून नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता. त्यात अर्ज केल्यानंतर प्रिंट घ्या.

ITBP कॉन्स्टेबल ट्रेडसमन भर्ती 2022 येथे अर्ज करा. अर्ज करण्यासाठी शुल्क जमा करणे आवश्यक आहे. या रिक्त पदांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क आहे. इतर सर्व उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतील. अधिक तपशीलांसाठी सूचना पहा.

या पदांवर भरती केली जाणार आहे
एकूण पदे – २८७

कॉन्स्टेबल टेलर – १८ पदे

कॉन्स्टेबल गार्डनर – १६ पदे

कॉन्स्टेबल – ३१ पदे

कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी – ७८ पदे

कॉन्स्टेबल वॉशरमन – ८९ पदे

कॉन्स्टेबल नाई – ५५ पदे

मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेले उमेदवार कॉन्स्टेबल टेलर, गार्डनर आणि मोची या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच ज्यांच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी, वॉशरमन आणि नाई या पदांसाठी फक्त 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा पदानुसार वेगळी आहे. हवालदार, शिंपी, माळी आणि मोची या पदांसाठी 18 ते 23 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आणि हवालदार, सफाई कामगार आणि नाई या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या CPC अंतर्गत 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल. याशिवाय तुम्हाला इतर भत्त्यांचा लाभ मिळेल. त्यामुळे आता १० वी पास झालेल्या तरुणांसाठी नोकरीची ही मोठी संधी आहे.  

Web Title: Golden job opportunity itbp constable tradesman recruitment 2022 apply online at recruitment itbpolice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.