सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:39 IST2025-08-20T15:37:44+5:302025-08-20T15:39:07+5:30

BSF मध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

BSF Bharati 2025:Mega recruitment for Head Constable posts in BSF; Application process will start from this date | सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

BSF Bharati २०२५: भारतीय सैन्यात काम करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हीही यासाठी तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सीमा सुरक्षा दल, म्हणजेच BSF ने हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती काढली आहे. या पदांची भरती प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. 

रिक्त पदांची माहिती

या भरती मोहिमेद्वारे एकूण ११२१ पदे भरली जातील.

एचसी (RO): ९१० पदे

एचसी (RM): २११ पदे

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) चा समावेश असेल, त्यानंतर संगणक आधारित परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल.

परीक्षेचा नमुना
संगणक आधारित चाचणी फक्त इंग्रजी आणि हिंदी माध्यमात घेतली जाईल.

बहुपर्यायी प्रश्नांची (MCQ) संगणक आधारित चाचणी २ तासांची असेल.

परीक्षा निवडक केंद्रांवर मुख्यालय महासंचालक, सीमा सुरक्षा दलाने निश्चित केलेल्या तारखेला आणि वेळेत घेतली जाईल.

अर्ज शुल्क
अनारक्षित (UN), इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील (EWS) पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये (प्रति पद) आहे. परीक्षा शुल्क नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड आणि जवळच्या अधिकृत सामान्य सेवा केंद्राद्वारे भरता येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार बीएसएफच्या अधिकृत वेबसाइट, rectt.bsf.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 


 

Web Title: BSF Bharati 2025:Mega recruitment for Head Constable posts in BSF; Application process will start from this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.