आयटी क्षेत्रामध्ये चालू वर्षात १.३५ लाख नव्या नोकऱ्यांची संधी; महसूल जाणार ३१५ अब्ज डॉलरवर ; नॅसकॉमचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 04:52 IST2026-03-04T04:52:26+5:302026-03-04T04:52:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली ...

1.35 lakh new job opportunities in IT sector this year; Revenue to reach $315 billion; Nasscom estimates | आयटी क्षेत्रामध्ये चालू वर्षात १.३५ लाख नव्या नोकऱ्यांची संधी; महसूल जाणार ३१५ अब्ज डॉलरवर ; नॅसकॉमचा अंदाज

आयटी क्षेत्रामध्ये चालू वर्षात १.३५ लाख नव्या नोकऱ्यांची संधी; महसूल जाणार ३१५ अब्ज डॉलरवर ; नॅसकॉमचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा महसूल ६.१ टक्क्यांनी वाढून ३१५ अब्ज डॉलरच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचेल, असा विश्वास ‘नॅसकॉम’ने मंगळवारी व्यक्त केला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र रोजगाराचे प्रमुख क्षेत्र राहिले आहे. यंदा येथे १.३५ लाख तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 

नॅसकॉमचे अध्यक्ष राजेश नांबियार यांनी माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या प्रगतीबाबत माहिती देताना सांगितले की, हे क्षेत्र अजूनही मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे प्रमुख क्षेत्र राहिले आहे. २०२५-२६ या वर्षात आयटी क्षेत्रातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २.३ टक्क्यांनी वाढून ५९.५ लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा ५८.२ लाख इतका होता. विशेष म्हणजे, या वर्षात १.३५ लाख नवीन तरुणांना या क्षेत्रात थेट रोजगार मिळेल.

‘एआय’चा करिश्मा
सध्या जगभरात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची (एआय) चर्चा असताना, भारतीय कंपन्यांनीही यात मोठी झेप घेतली आहे. तंत्रज्ञान क्षेत्राच्या एकूण महसुलापैकी १० ते १२ अब्ज डॉलरचा हिस्सा हा केवळ नव्या पिढीच्या तंत्रज्ञान सोल्युशन्समधून (जनरेटिव्ह एआय) येत असल्याचे नॅसकॉमने स्पष्ट केले.

महसुली अंदाजात सुधारणा
नॅसकॉमने मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ चा यापूर्वीचा २८२.६ अब्ज डॉलरचा महसुली अंदाज सुधारून तो २९७ अब्ज डॉलर केला आहे. आव्हानात्मक परिस्थिती असूनही २०२४-२५ मध्ये ५.९ टक्के असलेला महसूल वृद्धीचा दर २०२५-२६ मध्ये ६.१ टक्क्यांवर पोहोचणे, हे भारतीय आयटी कंपन्यांच्या जागतिक वर्चस्वाचे प्रतीक मानले जात असल्याचे नॅसकॉमने म्हटले आहे.

Web Title : भारतीय आईटी क्षेत्र में 1.35 लाख नौकरियां, राजस्व में उछाल

Web Summary : भारतीय आईटी क्षेत्र को मजबूत विकास की उम्मीद, वित्त वर्ष 2025-26 में 315 अरब डॉलर राजस्व का अनुमान, 6.1% की वृद्धि। नैसकॉम ने 1.35 लाख नई नौकरियों का अनुमान लगाया है, जो एआई और प्रौद्योगिकी समाधानों में उन्नति से प्रेरित है, जिससे कुल कर्मचारी संख्या 59.5 लाख तक पहुंच जाएगी।

Web Title : Indian IT sector to add 1.35 lakh jobs, revenue soaring.

Web Summary : India's IT sector anticipates robust growth, projecting $315 billion revenue, a 6.1% increase, in fiscal year 2025-26. NASSCOM forecasts 1.35 lakh new jobs, fueled by advancements in AI and technology solutions, boosting total employee count to 59.5 lakh.