शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

शिक्षिकेस जि.प. प्रशासनाचे अभय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:16 AM

खामगाव:  शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असतानाही आरोपी शिक्षिकेस माहिती पुरविण्यात तत्परता दाखविण्यासोबतच सदर शिक्षिकेच्या निलंबनासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. 

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून निलंबित करण्यास टाळाटाळ 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असतानाही आरोपी शिक्षिकेस माहिती पुरविण्यात तत्परता दाखविण्यासोबतच सदर शिक्षिकेच्या निलंबनासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. एकाच वेळी एमएड महाविद्यालय आणि शाळेवरही हजर असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने, जिल्हा परिषद शिक्षिका कल्पना ठग यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा ४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला; मात्र गुन्हा दाखल झाल्यापासूनच संबंधित शिक्षकेच्या निलंबनाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, कल्पना ठग यांच्या फसवणूक प्रकरणात शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याने, खामगाव येथील संजय वर्मा यांनी  न्यायालयात फौजदारी प्रकरण दाखल केले आहे. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाच जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठग यांना पाठीशी घातल्या जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, फरार आरोपीस जिल्हा परिषद प्रशासनाने माहिती पुरविल्याचे उघडकीस आल्याने तसेच दोन महिन्यांपासून या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

असे आहे प्रकरण!बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत चिखला येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असतानाच सन २0१२-१३ मध्ये नियमीत बीएड अभ्यासक्रमासाठी तर २0१३-१४ मध्ये एमएड अभ्यासक्रमासाठी त्यांनी शाहू महाराज महाविद्यालय माळविहिर येथे प्रवेश घेतला होता. यासाठी त्यांनी कोणत्याही सक्षम अधिकार्‍याची परवानगी घेतली नाही. त्याचवेळी चिखला येथील शाळेतील हजेरीपत्रकावर स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. याप्रकरणी ४ सप्टेंबर रोजी ठग यांच्याविरोधात कलम ४२0 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलंबन व खाते चौकशीचे आदेश परत!फसवणूक प्रकरणात दोषी आढळल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी दीपा मुधोळ यांनी कल्पना ठग यांच्या निलंबन व खाते चौकशीचे आदेश १0 सप्टेंबर २0१५ रोजी दिले होते. दरम्यान, अवघ्या सहा दिवसांमध्ये म्हणजेच १६ सप्टेंबर २0१५ रोजी परत घेतले होते. या कार्यकाळात ठग यांच्या भगिनी वैशाली ठग शिक्षणाधिकारी होत्या. 

अटकपूर्व जामिनासाठी परवनागीसंदर्भात सांगता येणार नाही; मात्र जिल्हा परिषद शिस्त व अपील नियमातंर्गत एखाद्याने ४८ तासापेक्षा जास्त काळ पोलीस कस्टडीत काढल्यास निलंबनाची तरतूद आहे. दरम्यान, शिक्षिका कल्पना ठग यांच्या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. ठग यांच्या प्रकरणातील फाइल सामान्य प्रशासन विभागात सादर करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच कारवाईचे संकेत आहेत.- एन.के. देशमुख,शिक्षणाधिकारी, जि.प. बुलडाणा.

टॅग्स :zpजिल्हा परिषदTeacherशिक्षक