शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचा ‘भूगोल’ कच्चाच!

By admin | Updated: January 14, 2015 00:33 IST

आज भूगोल दिन ; परिसरातील भौगोलिक ज्ञानही अपुरेच.

बुलडाणा : इतिहास शिकणे व त्यातून इतिहास घडविणे या बाबींकडे जाणीवपुर्वक लक्ष दिल्या जाते. मात्र इतिहासासोबतच जोड असलेल्या भुगोल या विषयासंदर्भात कमालीची अनास्था व अज्ञान असल्याची बाब समोर आली आहे. लोकमतने बुलडाणा शहरातील निवडक महाविद्यालयात केलेल्या सर्व्हेक्षणात आजच्या तरूणाईला भुगोलाचे ज्ञान हे अपूरे असल्याचे स्पष्ट झाले आहे. १४ जानेवारी हा दिवस जागतिक भुगोल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने बुलडाणा शहराच्या परिसरातील तसेच जिल्ह्यातील भौगोलिक माहितीबाबत १३ जानेवारी रोजी प्रश्नावलीच्या स्वरूपात तरूणांना प्रश्न विचारले. यामध्ये जिल्ह्यातून उगम पावणार्‍या नद्या, पर्वतरांगा, भौगोलिक वैशिष्ट्ये दिशा, उपदिशा यांचा समावेश केला होता. वर्ग १२ ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांंकडून ही प्रश्नावली भरून घे तली. त्यामध्ये भुगोल याविषयासंदर्भात अनेकांना माहितीच नाही, हे स्पष्ट झाले. भुगोल या विषयासंदर्भात रूची निर्माण होण्यासाठी हा विषय रंजक पध्दतीने शिकविला जावा. अध्यापक महाविद्यालयांमध्येसुध्दा भुगोल अध्यापन पध्दतीबाबत उदासिनता दिसून येते. त्यामुळेच दहावीनंतर हा विषय अभ्यासाला घेतल्या जात नाही. हे चुकीचे आहे. त्यामुळेच भुगोलाविषयी अज्ञान वाढत असल्याचे बुलडाणा येथील भारत विद्यालयाचे शिक्षक शिवशंकर गोरे स्पष्ट केले. *भूगोल दिन कधी साजरा केला जातो ?१४ जानेवारी रोजी भुगोल दिवस साजरा केला जातो. यानिमित्त भुगोल या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित केले जातात. ५0 टक्के तरूणांनी १४ जानेवारी हे उत्तर दिले तर ३४ टक्के तरूणांनी १५ जानेवारी तसेच १६ टक्के तरूणांनी २६ जानेवारी हा पर्याय निवडला. *पूर्व व दक्षिणमध्ये उपदिशा कोणती ? चार मुख्य दिशांची माहिती सर्वांंनाच असते. मात्र उपदिशा ठरवितांना अनेकांचा गोंधळ होतो. पुर्व आणि दक्षिण या दोन दिशांच्या मध्ये येणारी आग्नेय ही उपदिशा ४७ टक्के तरूणांनी योग्य सांगितली. मात्र १३ टक्के तरूणांनी वायव्य तर प्रत्येकी २0 टक्के तरूणांनी नैऋत्य आणि इशान्य असे पर्याय निवडले. *बुलडाणा जिल्ह्याचे भौगोलिक आश्‍चर्य कोणते ?लोणार हे जिल्ह्यातीलच नव्हे तर जगातिल भौगोलिक आश्‍चर्य आहे. त्यामुळे लोणार या पर्यायाला ८0 टक्के तरूणांनी योग्य उत्तर दिले. १२ टक्के अजिंठा लेणीभोवती घुटमळले तर ८ टक्के तरूणांना आनंद सागर हा पर्याय योग्य वाटला. बुलडाण्यातून उगम पावणारी नदी कोणती ?बुलडाणा परिसरातील बुधनेश्‍वर येथून पैनगंगा नदी उगम पावते. या नदीच्या उगमस्थानी प्राचिन शिवमंदिर आहे. मात्र केवळ ३३ टक्के तरूणांना पैनगंगा हा पर्याय निवडता आला. प्रत्येकी २0 टक्के तरूणांनी खडकपुर्णा व पुर्णा तर २६ टक्के तरूणांनी मन या नदीचा पर्याय निवडला असल्याने नद्यांच्या माहि तीसंदर्भात अनास्था दिसली. खारपाणपट्टा कुठल्या नदीच्या काठी आहे ?पुर्णा नदी ही जीवनदायी असली तरी या नदीच्या काठी असलेल्या खारपाणपट्यामुळे कित्येक बळी गेले आहेत. खारपाणपट्टा पुर्णा काठी असल्याचे २६ टक्के तरूणांनी सांगितले. ३३ टक्के तरूणांनी खडकपुर्णा तर १३ टक्के विश्‍वगंगा व २६ टक्के नळगंगा अशी उत्तरे मिळाली.बुलडाणा जिल्ह्यात किती अभयारण्ये आहेत ?ज्ञानगंगा, अंबाबारवा व लोणार असे तिन अभयारण्य जिल्ह्यात आहेत. मात्र ३ हे उत्तर केवळ ४६ टक्के तरूणांनी दिले. प्रत्येकी २६ टक्के तरूणांनी २ आणि ४ अभयारण्य असल्याचे पर्याय निवडले आहेत. त्यामुळे वनासंदर्भातही तरूणांचे अज्ञान समोर आले. *बुलडाणा शहराच्या उत्तरेकडील पर्वतरांगा ?बुलडाणा शहराच्या उत्तरेकडे असणारा राजूरचा घाट हा अजिंठा पर्वतरांगामध्ये आहे. अजिंठा पर्वतरांग हे योग्य उत्तर ४0 टक्के तरूणांनी दिले. मात्र ३६ टक्के तरूणांना सातपुडा व २४ टक्के तरूणांनी सह्यादी उत्तर दिले. जवळच्या पर्वतरांगांची माहितीसुध्दा अनेकांना नाही. *भूगोल हा विषय पदवीपर्यंंत असावा ?बुलडाणा जिल्ह्यात पदवीसाठी एकाही महाविद्यालयात भुगोल विषय नाही. अकोल्यात दोन तर वाशिममध्ये एका महाविद्यालयात हा विषय आहे. त्यामुळे हा विषय ऐच्छिक असावा असे ७0 टक्के तरूणांना वाटते तर ३0 टक्के तरूणांना अनिवार्य असावा असे वाटते.