अपघातात रुस्तमपूर येथील युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 11:39 IST2021-09-11T11:38:58+5:302021-09-11T11:39:06+5:30
Accident News : शिवपालसिंह सुरतसिंह राजपूत (२६), रा. रुस्तमपूर, जि. खंडवा हा युवक गंभीर जखमी झाला.

अपघातात रुस्तमपूर येथील युवक ठार
खामगाव : रस्ता अपघातात एक युवक ठार झाला. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास खामगाव- नांदुरा रस्त्यावर ही घटना घडली. शिवपालसिंह सुरतसिंह राजपूत (२६), रा. रुस्तमपूर, जि. खंडवा हा युवक गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला सुरुवातीला नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.