तामगाव पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 16:46 IST2024-03-02T16:46:18+5:302024-03-02T16:46:53+5:30

समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकार उघड

Youth brutally beaten by Tamgaon police; The video went viral | तामगाव पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

तामगाव पोलिसांकडून तरुणाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

संग्रामपूर (बुलढाणा) : पोलिसांकडून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे संग्रामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील पातुर्डा येथील एका युवकाला येथील तिवारी नामक पोलिस कर्मचारी अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. पोलिसाकडून युवकाला अमानुष मारहाण करण्याचे कारण अजून समजले नाही. दरम्यान, ज्यांनी वाद सोडवायचे, लोकांना न्याय द्यायचा, तेच पोलिस सर्वसामान्य नागरिकांवर बळाचा वापर करीत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गाव, परिसर आणि पोलिस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे, लोकांच्या समस्या सोडविणे आणि अन्याय झालेल्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे ही कामे प्रामुख्याने पोलिसांची आहेत. मात्र, तामगाव पोलिस स्टेशनचाच कारभार सद्य:स्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे तामगाव पोलिस स्टेशन आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे.

समाज माध्यमांवर व्हायरल व्हिडीओच्या अनुषंगाने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे.
- राजेंद्र पवार, ठाणेदार, तामगाव पोलिस स्टेशन

Web Title: Youth brutally beaten by Tamgaon police; The video went viral