सिंदखेड मातला येथे विहीर खोदकाम दरम्यान डोक्यात दगड पडल्याने मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:47 IST2018-01-31T00:47:26+5:302018-01-31T00:47:41+5:30
पिंपळगाव सैलानी : रायपूर पोलीस ठाण्यांतर्गत सिंदखेड मातला येथे विहीर खोदकाम दरम्यान डोक्यात दगड पडून गजानन बाबूराव करडक (३0) या मजुराचा ३0 जानेवारी रोजी मृत्यू झाला.

सिंदखेड मातला येथे विहीर खोदकाम दरम्यान डोक्यात दगड पडल्याने मजूर ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सैलानी : रायपूर पोलीस ठाण्यांतर्गत सिंदखेड मातला येथे विहीर खोदकाम दरम्यान डोक्यात दगड पडून गजानन बाबूराव करडक (३0) या मजुराचा ३0 जानेवारी रोजी मृत्यू झाला.
मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मृत गजानन करडक हे रायपूर येथील रहिवासी होते. सिंदखेड मातला येथील विजय चिकटे यांच्या विहिरीचे काम सुरू होते. तेथे ते कामासाठी गेले होते. खोदकाम दरम्यान दरड कोसळली. त्यात गजानन करडक याच्या डोक्यावर दगड पडून तो त्यात गंभीर जखमी होऊन मृत पावला. त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. विहीर खोदताना सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने अशा घटना घडत आहेत. वृत्त लिहिपर्यंत याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.