जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम भेंडवळ बु. येथे २ जुलै रोजी दुपारी ४ वाजताचे दरम्यान वीज अंगावर कोसळून एक महिला ठार झाली तर तीन महिला जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत माहिती अशी की, सदर महिला ह्या भेंडवळ येथील असून त्या शेतात काम करीत होत्या. दुपारच्या वेळी आभाळ भरून आले व अचानक पाऊस सुरू झाला. त्यातच वीज कोसळली. त्यामध्ये कुसुमबाई भगवान जाधव (वय ५२) ही महिला भाजल्याने जागीच ठार झाली. तर प्रमिला विश्वनाथ लहुरकर (वय ४५), मुक्ता अर्जुन पुंडे (वय २५), आणि छाया विनोद काळगे (वय ३०) ह्या तीन महिला जखमी झाल्या आहेत.जखमी महिलांना उपचारार्थ खामगाव येथील शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आल्याची माहिती आहे. यासंदर्भात तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल पाठविला. तर जळगाव जामोद तहसिलदार शिवाजीराव मगर यांनी जिल्हाधिकारी नैसर्गिक आपत्ती विभाग यांना कळविले आहे. (प्रतिनिधी)
भेंडवळ येथे वीज पडून महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:35 IST