शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या हाती एसटीचे स्टिअरिंग येण्यापूर्वीच लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 11:14 IST

ST Bus News बससेवा संपूर्णपणे पूर्ववत सुरू झाली असतानाही चालक-वाहकांचे सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्याला मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमहिला चालक येणार असल्याचा गाजावाजा करून सरळसेवा भरती घेतली होती.मध्ये राज्यात १६३ महिलांची नियुक्ती करण्यात आली.चालक-वाहकांचे सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्याला मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

- ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सरळसेवा भरती २०१९मधील उमेदवारांचे स्थगित असलेले सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्याकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून प्रशिक्षण स्थगित असल्याने महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग येण्यापूर्वीच ब्रेक लागला. दरम्यान, महिला उमेदवारांना उर्वरित चालकाचे प्रशिक्षण न देता वाहक पदाचे प्रशिक्षण देऊन वाहक पदावर रुजू करून घेण्याला एसटी महामंडळाकडून नकार दर्शविण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीमध्ये महिला चालक येणार असल्याचा गाजावाजा करून सरळसेवा भरती घेतली होती. त्यामध्ये राज्यात १६३ महिलांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर प्रशिक्षणही सुरू झाले होते. परंतु काही दिवसातच  कोरोनामुळे चालक, वाहक उमेदवारांचे हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुढील प्रशिक्षण पुन्हा चालू करून प्रशिक्षण संपताच उमेदवारांना सेवेमध्ये घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु राज्यात सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर व बससेवा संपूर्णपणे पूर्ववत सुरू झाली असतानाही चालक-वाहकांचे सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्याला मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिला उमेदवारांचे उर्वरित चालकाचे प्रशिक्षण न देता वाहकाचे प्रशिक्षण देऊन वाहक म्हणून त्यांना रुजू करून घ्यावे, अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांनी एसटी महामंडळाकडे मागील महिन्यात केली होती. परंतु ही भरतीप्रक्रिया चालक तथा वाहक या पदासाठी असल्याने जाहिरातीतील पात्रतेमध्ये बदल न करता महिला उमेदवारांना फक्त वाहक पदासाठी प्रशिक्षण देऊन वाहक पदात रुजू करून घेता येणार नाही, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे चालक, वाहक पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. 

प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन प्राप्त होताच कार्यवाहीउमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत मध्यवर्ती कार्यालय राज्य परिवहन महामंडळ, मुंबई यांना मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन प्राप्त होताच उमेदवारांचे पुढील सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. सरळसेवा भरती प्रक्रिया ही दिलेल्या नियमानुसार होईल.- संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा

उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यातवर्षभरापासून चालक-वाहक पदाचे सेवापूर्व प्रशिक्षण स्थगित करण्यात आले आहे. नियुक्त झालेल्या उमेदवारांना कुठलेही मानधन नाही. त्यामुळे उमेदवार अडचणीत सापडले आहेत. मुलींचेही वय निघून जात आहे. प्रशिक्षण लवकर व्हावे यासाठी उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.- वैशाली तायडे, महिला उमेदवार

टॅग्स :state transportएसटीbuldhanaबुलडाणा