शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

‘वन्यजीव सोयरे’ जपतात वनांचे पूजन करण्याची पंरपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 1:56 PM

ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरेंकडून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पर्यावरण संवर्धन आज काळाची गरज झाली आहे. त्यामुळे शासनस्तरावरून वृक्षलागवडीसारखे अनेक पर्यावरण पुरक कार्यक्रम राबविण्यात येतात. मात्र वनांचे पूजन करण्याची अनोखी पंरपरा येथील वन्यजीव सोयरे जपत असल्याचे दिसून येते. ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव सोयरेंकडून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण राखण्याऐवजी दिवसेंदिवस यातही घटच होत आहे. गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली आहेत. वनसंवर्धन करने आजची गरज बनले आहे. प्रत्येक नागरिकाने वनांचे संवर्धन करायला हवे वन्यजीव सोयरे, बुलडाणा यांच्याकडून वनसंवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. वन्यजीव सोयरेंकडून ज्ञानगंगा अभयारण्यात ५० झाडे, कलमा आणि बियांचे बीजारोपण करून वनांचे पूजन करून वनसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. सुरुवातीला वन्यजीव सोयरे बुलडाणाच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. वंदना काकडे आणि प्रभावती चिंचोले यांच्या हस्ते वृक्ष पूजन तसेच वन पूजन करण्यात आले. या मोहिमेला वन्यजीव सोयरे धनंजय गवई, शशांक गवई, अभिषेक बाहेकर, अमित श्रीवास्तव, अनिल अंभोरे, एन. टी. परलकर प्रकाश डब्बे, मुकुंद वैष्णव, शाम राजपूत, नितिन श्रीवास्तव यांनी श्रमदान केले. या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरले लहान वन्यजीव सोयरे अभिराम परळकर आणि कार्तिक परळकर. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वनांचे पूजन करून, वन संवर्धनाची शपथ घेण्याची पंरपरा गेल्या काही वर्षापासून वन्यजीव सोयरेंकडून जपली जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाNatureनिसर्ग