विधवा, निराधार महिलेला दिली ११ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:24+5:302021-01-14T04:28:24+5:30
बुलढाणा जिल्ह्यात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने मदत करतो; परंतु मेहकर पंचायत समितीमधील साहाय्यक गटविकास अधिकारी ...

विधवा, निराधार महिलेला दिली ११ हजारांची मदत
बुलढाणा जिल्ह्यात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने मदत करतो; परंतु मेहकर पंचायत समितीमधील साहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे हे जिल्ह्यात दानशूर व्यक्तींमध्ये अग्रेसर आहेत. विजय वाघमारे याचे व्यसनाधीनतेमुळे निधन झाले. कुटुंब उघड्यावर पडलेले असल्याचे त्यांना समजले. समजताक्षणीच त्या निराधार कुटुंबातील विधवा महिलेला ग्रामगीता देऊन त्यांनी ११ हजारांची आर्थिक मदत केली. यावेळी शेतीपूरक व्यवसाय व गृहउद्योगाबाबत माहिती देण्यात आली. मागील पाच वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत असलेल्या वर्षा देशमुख व मीरा देशमुख, अंत्री देशमुख यांनी सेंद्रिय शेतीबाबत महिलांना मार्गदर्शन केले. उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक धनंजय कायंदे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी समाजसेवक गजानन पाटोळे, धनंजय कायंदे, वर्षा देशमुख, मीरा देशमुख, अंत्री देशमुख, मदन वैराळ सरपंच, परमेश्वर वैराळ, पोलीस पाटील, काळे ग्रामसेवक, वाढे, सुभाष वैराळ, रवी वैराळ, नीलेश वाघमारे, परशराम जाधव, जितू देशमुख, शिवाजी वैराळ, अक्षय तांगडे, आदी तथा महिला, भगिनी उपस्थित होत्या.