"तुमच्या शेतात स्वीमिंग पूल बांधून देतो", पुण्यातील पती-पत्नीने शेतकऱ्यांकडून पाच लाख घेतले अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 00:41 IST2026-01-22T00:40:11+5:302026-01-22T00:41:56+5:30

स्वीमिंग पूलच्या नावाखाली विश्वासघात; देऊळगाव राजातील शेतकऱ्याची पाच लाखांची फसवणूक

"We will build a swimming pool in your farm", a Pune couple took five lakhs from farmers and... | "तुमच्या शेतात स्वीमिंग पूल बांधून देतो", पुण्यातील पती-पत्नीने शेतकऱ्यांकडून पाच लाख घेतले अन्... 

"तुमच्या शेतात स्वीमिंग पूल बांधून देतो", पुण्यातील पती-पत्नीने शेतकऱ्यांकडून पाच लाख घेतले अन्... 

शेतजमिनीत स्वीमिंग पूल उभारून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पाच लाख रुपयांची रक्कम उचलून काम न करता आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार देऊळगाव राजा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील एका दाम्पत्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक फसवणूक व विश्वासघाताचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

सोमवारी (१९) देऊळगाव राजा शहरातील बालाजीनगरमध्ये राहणारे राजेश शिवरतनजी भुतडा (४१) यांनी देऊळगाव राजा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सचिन यशवंत कलगे व अमृता सचिन कलगे (दोघेही रा. रॉयल ऑर्चिड) यांनी देऊळगाव राजा येथील त्यांच्या स्वतःच्या जागेत स्वीमिंग शेतजमिनीत पूल बांधून देण्याचा प्रस्ताव दिला. विश्वास संपादन करून त्यांनी या कामासाठी १७ ते २६ मे २०२५ या कालावधीत एकूण पाच लाख रुपये उचलले.

मात्र, ठरल्याप्रमाणे कोणतेही काम सुरू न करता तसेच दिलेल्या रकमेचा उपयोग न करता कलगे दाम्पत्याने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वारंवार पाठपुरावा करूनही काम न झाल्याने तसेच रक्कम परत न मिळाल्याने अखेर भुतडा यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रारीची सखोल चौकशी केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून गुन्हा दाखल करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार आरोपींविरुद्ध फसवणूक करून आर्थिक नुकसान करणे आणि विश्वासघात करणे, या स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर प्रकरणाचा तपास देऊळगाव राजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करीत असून, आर्थिक व्यवहारांचे कागदपत्रे आणि आरोपींच्या भूमिकेची सखोल तपासणी सुरू आहे.

Web Title : स्विमिंग पूल का वादा झूठा: पुणे के दंपत्ति ने किसान को ठगा।

Web Summary : पुणे के एक दंपति ने कथित तौर पर देउलगाँव राजा में एक किसान को उसके खेत पर स्विमिंग पूल बनाने का झूठा वादा करके ₹5 लाख की ठगी की। पुलिस ने दंपति के खिलाफ धोखाधड़ी और विश्वासघात का मामला दर्ज किया है, जिन्होंने पैसे लिए लेकिन कभी काम शुरू नहीं किया।

Web Title : Swimming pool promise turns sour: Pune couple dupes farmer.

Web Summary : A Pune couple allegedly defrauded a farmer in Deulgaon Raja of ₹5 lakh with the false promise of building a swimming pool on his farm. Police have registered a case of fraud and breach of trust against the couple, who took the money but never started the work.