शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

१६ गावांसाठी पाण्याचे टँकर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 00:19 IST

बुलडाणा : पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील १६ गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे

बुलडाणा : पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट जिल्ह्यातील १६ गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये दे.राजा तालुक्यातील धोत्रा नंदई गावाचा समावेश आहे. तसेच सिं.राजा तालुक्यातील सावरगांव माळ गावाचाही समावेश आहे. धोत्रानंदई गावाकरिता २४ मेट्रीक टन क्षमतेचे १ टँकर दिवसातून ३ फेऱ्या मारणार आहे. सावरगांव माळसाठी २४ मेट्रीक टन क्षमतेचे १ टँकर दिवसातून ३ फेरी मारणार आहे. त्याचप्रमाणे बुलडाणा तालुक्यातील चौथाकरिता याच क्षमतेचे एक टँकर २ फेरी दिवसातून मारणार आहे. तसेच माळविहीर गावासाठी १ टँकर दिवसातून ३ फेऱ्या, हनवतखेडकरिता १ टँकर दिवसातून एक फेरी व गिरडा, गोंधनखेड लोकसंख्येसाठी १ टँकर २ फेरी, जांबच्या ३२१० लोकसंख्येसाठी १ टँकर ३ फेऱ्या आणि देऊळघाट येथील १६ हजार लोकसंख्येकरिता ६ टँकर दिवसातून ३ फेऱ्या मारणार आहे. रायपूर व शिरपूरच्या अनुक्रमे ९५५० व ५२५३ लोकसंख्येकरिता दोन टँकर दिवसातून ६ फेऱ्या मारणार आहे.तसेच चिखली तालुक्यातील भोगावती येथील १०२० लोकसंख्येसाठी २४ मेट्रीक टन क्षमतेचे १ टँकर दिवसातून २ फेऱ्या मारणार आहे. सैलानी नगर येथे २५५३ लोकांसाठी १ टँकर दिवसातून ३ फेरी मारणार आहे. डोंगरशेवली येथील ३८५० लोकसंख्येकरिता २ टँकर ४ फेरी, धोडपच्या १४८० लोकसंख्येसाठी १ टँकर ३ फेरी, कोलारा गावच्या ३७५५ लोकसंख्येकरिता १ टँकर दिवसातून ३ फेरी व पळसखेड सपकाळ गावच्या ७०० लोकसंख्येकरिता १ टँकर दिवसातून ३ फेरी मारणार आहे. गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांना वेळोवेळी भेटी देवून टँकरच्या खेपांची नोंद तपासावी. ग्रामपंचायतीने नोंद व्यवस्थित घ्यावी. टँकरचे पाणी शुद्ध करूनच पुरविल्या जात असल्याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई विभागाने कळविले आहे.