शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यात ३१ गावांमध्ये पाणी समस्या गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:20 IST

तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या यादीत आणखी काही गावांची भर पडणार असून, यामध्ये चिखली शहराचाही समावेश आहे.

ठळक मुद्देसहा गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण एका गावास टँकरने पाणी पाणी पुरवठा

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यात यावर्षी दिलासादायक पाऊस पडला असला तरी पाणीपुरवठय़ाच्या जलस्रोतांमध्ये  जलसाठा होऊ न शकल्याने अनेक गावांत पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. तालुक्यातील मुख्य नदी पैनगंगेला तसेच इतर सर्वच लहान-मोठय़ा नद्यांना यावर्षी एकही अपेक्षित  पूर आला नाही. त्यामुळे आज रोजी अनेक नद्यांचे पात्न कोरड्या स्थितीत आहे, तालुक्यातील काही तलाव कोरडे तर बहुतांश तलावांची पाण्याची मोठय़ा प्रमाणात पातळी खालावल्याने सद्यस्थितीत ३१ गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून, उन्हाच्या चटक्यांबरोबर पाणीटंचाईची ही समस्या दिवसागणिक भीषण रूप धारण करणारी असल्याने येत्या काळात पाणीटंचाईग्रस्त गावांच्या यादीत आणखी काही गावांची भर पडणार असून, यामध्ये चिखली शहराचाही समावेश आहे.शहरासह ग्रामीण भागात राहणार्‍या  नागरिकांना दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. उन्हाळय़ातील तळपत्या उन्हासोबत ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागत असून, तीव्र पाणीटंचाईचा समाना करावा लागणार्‍या गावांच्या यादीत अधिक भर पडली आहे. तालुक्यातील १४४ गावांपैकी चिखली शहरासह ४१ गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात गत पावसाळय़ात १ जून २0१७ ते ३१ ऑक्टोबर २0१७ दरम्यान एकूण ७४0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; मात्र तरीही पाणीपुरवठय़ाच्या प्रमुख स्रोतांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात जलसाठा होऊ शकला नाही. तालुक्यातील लहान-मोठे, प्रकल्प, पाझर तलाव, नद्या, विहिरी यावरच पाणीपुरवठय़ाची संपूर्ण मदार अवलंबून असते; मात्र यंदा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच या जलस्रोतांनी तळ गाठायला सुरुवात केली होती. तर सद्यस्थितीत जवळपास काही जलशये कोरडे पडले आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ पंचायत समितीने चंदनपूर, मेरा खु., धोत्रा भनगोजी, पळसखेड जयंती, दिवठाणा, उंद्री या गावांच्या विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावास दिलेल्या मंजुरीवरून ऑक्टोबरपासून अधिग्रहित केलेल्या विहिरींवरून या गावांचा पाणीपुरवठा सुरू आहे. या व्यतिरिक्त शेलसूर, खोर, सावरगाव डुकरे, ईसोली, पळसखेड जयंती, दिवठणा, चांधई, धानोरी, सावरखेड कु., साकेगाव, गोदरी, पळसखेड दौलत, कारखेड, पेठ, वळती, धोडप, मालगणी, रानअंत्री, हातणी, मेरा बु., वैरागड, किन्ही सवडद, अंत्रीकोळी, वाघापूर, आमखेड, अंत्री खेडेकर, गांगलगाव, सवणा ही गावे तीव्र पाणीटंचाईच्या सावटाखाली असल्याने या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, दरवर्षी उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या निवारणार्थ शासनस्तरावर राबविण्यात येणार्‍या योजना तोकड्या पडत असून, नागरिकांना पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रचंड पायपीट पाचविला पुजलेली आहे. 

‘थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम’ची तांत्रिक अडचण कायम चिखली शहराला पाणीपुरवठा होणार्‍या पेनटाकळी प्रकल्पातून चिखली शहराची तहान भागविली जाते; मात्र पालिकेच्या सदोष वितरण व्यवस्थेमुळे शहराला कायम १0 ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून शहराला भेडसावत असल्याने शहराला ४ ते ५ दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा या हेतूने प्रकल्पातून पाणी उपसा करणार्‍या जुनाट पंप व मोटारींच्या जागी पालिकेने सुमारे सव्वा कोटी रुपयांचे पंप, मोटार व इतर साहित्य बसविले आहे; मात्र या पश्‍चातही शहराच्या पाणीपुरवठय़ात सुधारणा झालेली नाही. शहराच्या या समस्येवर उपायकारक ठरणारी थ्री व्हॉल्व्ह सिस्टीम गत काही वर्षांप्रमाणेच अद्यापही तांत्रिक अडचणींत असून, या तांत्रिक फेर्‍यात फसलेली ही योजना केव्हा कार्यान्वियत होणार याकडे लक्ष लागले आहे.

 ७ कोटी खचरूनही मेरा बु. बारमाही तहानलेलेतालुक्यातील मेरा बु. हे सुमारे ८ हजार ५२४ लोकसंख्या वस्तीचे हे गाव वर्षातील १२ महिने तहानलेले असते. गत दहा वर्षांपासून गावास तीव्र पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असल्याने ग्रामस्थांना हिवाळा व पावसाळय़ातदेखील पाणी विकत घ्यावे लागते. यावर उपाय म्हणून या गावात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, आठवड्यातून २१ फेर्‍यांद्वारे गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न होत असला तरी अनेक ग्रामस्थांना पाणी वेळेवर मिळत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करण्यासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विशेष बाब म्हणजे गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीने ७ कोटी ३ लाख रुपयांचा निधी खर्च केलेला असताना येथे बाराही महिने तीव्र पाणीटंचाई आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी