शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: October 20, 2014 00:12 IST

खामगाव विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांनंतर भाजपचे यश, आकाश फुंडकर विजयी.

अनिल गवई/ खामगाव (बुलडाणा)युवा उमेदवार आणि मोदींच्या जादूमुळे भारतीय जनता पक्षाला तब्बल १५ वर्षांनंतर आपल्या बालेकिल्ल्यावर पुन्हा कब्जा मिळविण्यात यश आले आहे. या मतदारसंघात पहिल्या फेरी पासून भाजपचे आकाश फुंडकर आघाडीवर होते. काँग्रेसच्या दिलीपकुमार सानंदा यांनी २१ पैकी कोणत्याही फेरीत मतांचा लीड कापला नाही. काही ठिकाणी ते आघाडीवर राहिले. मात्र, एकूण मतांची बेरीज कापण्यात अपयशी ठरल्याने सानंदा यांना दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये काढय़ाची लढत झाली. मात्र, मोदी अस्त्रांपुढे सोळाव्या फेरीचा निकाल घोषित होत अस तानाच, दिलीपकुमार सानंदा यांनी शरणागती पत्करली. मतमोजणी केंद्राबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मतविभाजन आणि मोदी लाटेमुळे आपला पराभव झाल्याची कबुली दिली. दुसर्‍या फेरीअखेरीस दिलीपकुमार सानंदा तिसर्‍या स्थानावर होते. तिसर्‍या फेरीत त्यांनी भारिपच्या अशोक सोनोने यांच्यावर आघाडी घेत दुसरे स्थान पटकाविले. परंतु, सुरूवातीपासूनच आघाडीवर असलेल्या आकाश फुंडकरांच्या एकूण मतांशी बरोबरी करण्यात एकदाही त्यांना यश आले नाही. शेवटच्या फेरीसोबतच पोस्टल मतांमध्ये सानंदा कमालीचे माघारले गेले. तत्पूर्वी, अकराव्या फेरीमध्ये सानंदांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या फेरीतही त्यांना फुंडकरांच्या तुलनेत २३७४ मतांची पिछाडी होती. निवडणुकीत आकाश फुंडकर यांना ७१ हजार ८१९ मते मिळाली. तिसर्‍या स्थानी असलेले भारिपच्या अशोक सोनोने यांचा संघर्ष मोठा आहे. पराभवानंतरही सतत लोकांच्या संपर्कात व प्रचाराच्या धामधुमीतही लोकसेवेत कायम असलेले सोनोने विजयाप्रत पोहोचू शकले नाहीत. दोन दिग्गजांच्या लढतीत त्यांनी घेतलेली मते ही त्यांच्या लोकसवेची पावती आहेत.