उरुस शरिफ संदलला सुरूवात; दुसरबीड येथील दर्गावर घडते एकतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:49 PM2018-04-12T14:49:42+5:302018-04-12T14:49:42+5:30

Ursus sandal sharif begins in dusarbeed | उरुस शरिफ संदलला सुरूवात; दुसरबीड येथील दर्गावर घडते एकतेचे दर्शन

उरुस शरिफ संदलला सुरूवात; दुसरबीड येथील दर्गावर घडते एकतेचे दर्शन

Next
ठळक मुद्देएकता कमेटीचे विश्वस्त माजी सरपंच सैय्यद दादामिया कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजता मिरवणूक (संदल) काढण्यात आली. मिरवणूक दर्गाहमध्ये पोहचल्यानंतर संदल व चादर अर्पण करून कुराण पठणानंतर धार्मिक विधी करण्यात आला.

दुसरबीड : हिंदू-मुस्लिम बांधावाचे ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव, मानवतेची शिकवण देणाऱ्या दुसरबीड येथील हजरत दादामियाँ यांच्या उरूस शरिफ संदलला बुधवारपासून उत्साहात सुरूवात करण्यात आली. येथील दर्गावर एकात्मतेचे दर्शन घडते. मानवता, बंधुता व समतेचा पुरस्कार करणारे हजरत दादामियाँ रहे.अ, हजरत भिकनशाह मियाँ रहे.अ., हजरत गैबनशाह मियाँ रहे.अ., हजरत चौकीपीर रहे.अ., हजरत मजीदबाबा नक्षबंदी रहे.अ. यांची जन्मभूमी आणि वास्तव्य ही दुसरबीडची ओळख आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दर्गाहमध्ये मानवतेचे धडे दिले जात आहेत. हजरत दादामियाँ यांच्या उरूसनिमित्त एकता कमेटीचे विश्वस्त माजी सरपंच सैय्यद दादामिया कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी २ वाजता मिरवणूक (संदल) काढण्यात आली. मिरवणूक दर्गाहमध्ये पोहचल्यानंतर संदल व चादर अर्पण करून कुराण पठणानंतर धार्मिक विधी करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती शेख इरफानअली, सैय्यद दादामियाँ कुरेशी, अबरार शेख फैजुल्ला, मुनाफ शेख प्यारमोहंमद, कौसरअली, अबरार शेख वाहेद, बुढण कुरेशी, हाजी शमशाद, शेख अमजत, शेख दिलावर, शेख सादीक, हाफीज जियाऊरहेमान, सकावत कुरेशी, समीर कुरेशी, सिकंदर कुरेशी, शेख हबीब, शेख लतीफ, तौफीक कुरेशी, वाजेद अली, इरफान शेख, याकुब शेख,निसाार शेख, सद्दाम शेख यांच्यासह बांधवांची उपस्थिती होती.

Web Title: Ursus sandal sharif begins in dusarbeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.