An unidentified vehicle hit a two-wheeler; Two killed | अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या कनका येथील दोघांचा अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. हा अपघात आठ आॅगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. शालीग्राम त्र्यंबक बोरुडे (२३) आणि वेदांत अमोल ठोकळ (१३) अशी या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवर (एमएच-२९-पी-६३९०) कनका येथून आठ आॅगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शेलगाव देशमुख येथे औषधी आणण्यासाठी जात होते. दरम्यान कनका गावानजीक असलेल्या आखाडे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दोघेही घटनास्थळीच ठार झाले. या प्रकरणी मृतक वेदांत ढोकळ यांच्या कांनी डोणगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास डोणगाव पोलिस करीत आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसात चिखली, मेहकर तालुक्यात रस्ते अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसापूर्वी पिंपळगाव सराई लगतच्या माळशेंबा येथे एकाचा जीपच्या धडकेत मृत्यू झाला होता तर साखरखेर्ड्यानीक दुचाकीवरील एकाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांतर आठ आॅगस्ट रोजी रात्री कनका येथील उपरोक्त दोघांचा अपगातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण आता वाढले असल्याचे चित्र आहे.

Web Title: An unidentified vehicle hit a two-wheeler; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.