चाकूच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटले; अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 13:37 IST2019-10-07T13:37:46+5:302019-10-07T13:37:54+5:30

हातातील घड्याळ, नगदी २ हजार रुपये, मोबाईल असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेत चोरट्यांना घटनास्थळावरुन पळ काढला.

A two-wheeler rider was robbed; Crime against an unknown person | चाकूच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटले; अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा

चाकूच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटले; अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा

अमडापूर : चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास अडवून १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी रात्री डोंगरशेवली पेट्रोलपंपानजीक घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुध्द अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कव्हळा येथील रवींद्र डाळिमकर हे त्यांच्या पत्नी व मुलाला बुलडाणा येथे दवाखान्यात घेऊन गेले होते. दवाखाना केल्यानंतर त्यांनी दोघांना एसटीत बसवून दिले. राहिलेली कामे उरकून ते एम- एच- २८- ए-एल- ८८५१ क्रमांकाच्या दुचाकीने बुलडाणा येथून गावी परत येत होते. साधारण ८.४५ वाजताच्या सुमारास डोंगरशेवली येथील पेट्रोलपंपानजीक तीन जण दुचाकीने पाठीमागून आले. डाळीमकर यांच्या दुचाकीला लाथ मारुन त्यांना खाली पाडले. एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला. खिशातील सर्व पैसे व वस्तू काढून देण्यास सांगितले. हातातील घड्याळ, नगदी २ हजार रुपये, मोबाईल असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेत चोरट्यांना घटनास्थळावरुन पळ काढला. डाळिमकर यांनी याबाबत अमडापूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार झांबरे करीत आहेत.

Web Title: A two-wheeler rider was robbed; Crime against an unknown person