खांबाला धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:08 AM2021-05-15T11:08:08+5:302021-05-15T11:08:25+5:30

Khamgaon Accident News: दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नांदुरा रोडवर असलेल्या हॉटेल गौरव समोर शुक्रवारी संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. 

Two-wheeler dies after being hit by a pole | खांबाला धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

खांबाला धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : भरधाव दुचाकीची विद्युत पोलला जोरदार धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नांदुरा रोडवर असलेल्या हॉटेल गौरव समोर शुक्रवारी संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास घडली. 
शहरातील आडीबीआय बँकेमध्ये प्रोबेशनरी आॅफिसर या पदावर असलेले रोनित मुशियारी (वय २६) रा.आसाम, ह. मु. देशमुख प्लॉट दुचाकी क्रमांक एमएच-१२-एसएस-१६२१ ने नांदुरा कडे जात होते. भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबावर आदळली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पंचनामा करून मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. रोनित आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

Web Title: Two-wheeler dies after being hit by a pole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app