दुचाकी, बैलगाडीची धडक, एक ठार; मासरूळ तराडखेड रस्त्यावरील घटना
By संदीप वानखेडे | Updated: August 30, 2023 16:04 IST2023-08-30T16:03:55+5:302023-08-30T16:04:41+5:30
घटनेचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी धाड येथे पाठवण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गावंडे करीत आहेत.

दुचाकी, बैलगाडीची धडक, एक ठार; मासरूळ तराडखेड रस्त्यावरील घटना
मासरूळ : भरधाव दुचाकी आणि बैलगाडीची धडक झाल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना २९ ऑगस्ट राेजी रात्री घडली. एकनाथ नारायण गुळवे (रा. मासरुळ ) असे मृताचे नाव आहे.
एकनाथ नारायण गुळवे हे दुचाकी क्रमांक एम.एच. २८, बीएन ८३९९ ने मासरूळ गावाकडे जात हाेते. दरम्यान, सय्यद हुसेन व त्यांचा मुलगा तौफिक हुसेन (रा. तराडखेड) हे दोघे मासरूळकडून तराडखेडकडे बैलगाडीने जात होते. दुचाकी आणि बैलगाडीची धडक झाल्याने एकनाथ गुळवे हे जागीच ठार झाले, तर बैलगाडीतील सय्यद तोसीफ हे जखमी झाले.
घटनेची माहिती मासरूळ येथील शेषराव सावळे यांनी धाड पोलिसपोलिसांना दिली़. त्यानंतर ठाणेदार मनीष गावंडे व बीट जमादार सोनुणे, चौधरी, पो.काॅ.खमाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी धाड येथे पाठवण्यात आला. पुढील तपास ठाणेदार गावंडे करीत आहेत.