शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

टिनपत्रे अंगावर पडल्याने दोन विद्यार्थी जखमी

By admin | Updated: January 1, 2017 01:36 IST

संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावातील घटना; शिकस्त इमारतीचा होत होता वापर.

संग्रामपूर, दि. ३१- तालुक्यातील बोडखा गावात जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा असून, शिकस्त झालेल्या इमारतीच्या व्हरांड्यात राष्ट्रगीत सुरू असताना शिकस्त सिमेंटचे वजनदार टिनपत्रे दोन विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्यामुळे एका विद्यार्थ्याच्या पायाला गंभीर मार लागला. तर दुसर्‍या विद्यार्थिनीच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली. या शाळेसाठी दोन वर्षांपूर्वी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन इमारतीमध्येच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या इमारतीला भव्य असा व्हरांडा व समोर पटांगणसुद्धा आहे; मात्र असे असतानाही मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत दररोज सकाळी शिकस्त झालेल्या व जुन्या इमारतीच्या व्हरांड्यातच राष्ट्रगीत घेत आहेत. मुख्याध्यापक गोगटे यांच्या निष्काळजीपणामुळे जुन्या व शिकस्त झालेल्या इमारतीच्या व्हरांड्यात २८ डिसेंबर रोजी राष्ट्रगीत घेण्यात आले. दरम्यान, राष्ट्रगीत सुरू असताना या जीर्ण झालेल्या इमारतीच्या व्हरांड्यातील छताची सिमेंटचे वजनदार टिनपत्रे इयत्ता पहिलीतील विद्यार्थी नमन श्रीकृष्ण कीर्तने याच्या पायावर पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. तर प्रणाली गौतम इंगळे या इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीच्या पाठीवर टिनपत्रा पडल्यामुळे तिच्या पाठीला मोठी जखम झाली; मात्र मुख्याध्यापक रामदास गोगटे यांनी या जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कुठलीही कल्पना न देता दुपारी ३ वाजेपर्यंत कुठलेही उपचार या विद्यार्थ्यांवर न करता या विद्यार्थ्यांना शाळेमध्येच बसवून ठेवले. या घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना पालकांनाच उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. या घटनेबाबतची कुठलीही माहिती न दिल्यामुळे पालकांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी मुख्याध्यापक रामदास गोगटे यांची कानउघाडणी केली. विशेष म्हणजे पालकांनी मुख्याध्यापक गोगटे यांना जीर्ण इमारतीच्या व्हरांड्यात राष्ट्रगीत घेऊ नका, याबाबत बर्‍याच वेळा सांगितले आहे; मात्र मुख्याध्यापक गोगटे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी पालक वर्गाकडून होत आहे.