शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

बुलडाणा  जिल्हा परिषदेत दोन कर्मचारी पॉझिटीव्ह ; कामकाज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 6:28 PM

आरोग्य विभागाचा एक आणि शिक्षण विभागातील एक कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्यानंतर दोन्ही कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले होते.

बुलडाणा : जिल्हा परिषदेत गत काही दिवसांपासून कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे, कर्मचाºयांनी धास्ती घेतली आहे. अशातच गुरूवारी आरोग्य विभागाचा एक आणि शिक्षण विभागातील एक कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्यानंतर दोन्ही कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले होते. या कार्यालयांचे निर्जुंतुकीकरण करण्यासाठी चार दिवस लागल्याने कामकाज प्रभावीत झाले होते. सोमवारी सकाळी दोन्ही कार्यालयांचे निर्जुंतुकीकरण करण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासकीय यंत्रणा उपाय योजना करण्यात दिरंगाई करीत असल्याचे चित्र आहे. आधी पॉझिटीव्ह रु ग्ण आढळताच तो परिसर सील करण्यात येत होता. तसेच पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटीन करून तपासणीसाठी नेण्यात येत होते. मात्र, गत काही दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय दिरंगाईचा फटका जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांना बसला. आधीच कोरोना संक्रमण वाढत असल्याने कर्मचाºयांमध्ये धास्ती आहे. त्यातच आरोग्य आणि शिक्षण विभागातील कर्मचारी पॉझिटीव्ह आल्याने कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण होते. गुरूवारी दुपारी या दोन्ही कार्यालयांचे कामकाज विस्कळीत झाले होते. शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशी दोन्ही कार्यालयाचे निर्जुंतुकीकरण होणे अपेक्षीत होते. मात्र, या दोन्ही कार्यालयांचे सॅनिटायझेशन चार दिवसांनी झाले. शासकीय कार्यालयांची ही अवस्था असताना ग्रामीण भागात निर्जुंतुकीकरणाची काय व्यवस्था असेल यांची कल्पना येते. 

टॅग्स :Buldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्या