चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघातात दोन जण ठार, तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:04 IST2020-01-15T13:04:23+5:302020-01-15T13:04:30+5:30
खामगाव तालुक्यातील कांचनपूर येथील परिवार पूणे येथे स्थायिक झालेले आहे. काही कामानिमित्त ते एम-एच-३०-ए-टी-३००९ क्रमांकाच्या कारने मूळ गावी निघाले होते.

चिखली-अमडापूर मार्गावर कार अपघातात दोन जण ठार, तिघे गंभीर
अमडापूर : कार अपघातात दोन जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान चिखली-अमडापूर मार्गावर घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलाचा समावेश असून त्यांना उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे. खामगाव तालुक्यातील कांचनपूर येथील परिवार पूणे येथे स्थायिक झालेले आहे. काही कामानिमित्त ते एम-एच-३०-ए-टी-३००९ क्रमांकाच्या कारने मूळ गावी निघाले होते. दरम्यान बुधवारी पहाटे सात वाजताच्या दरम्यान अमडापूरनजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या नालीत कोसळली. यामध्ये पार्वताबाई प्रकाश बहुरुपे (वय ५०) व प्रीती विलास बहुरुपे (वय २४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश प्रल्हाद बहुरुपे (वय ६० ), स्रेहल श्रीकांत भोजने (वय २७ ), विलास श्रीकांत भोजने (दीड वर्ष ) असे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय टेकाळे, परमेश्वर शिंदे, तडवी, वैद्य यांना घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन जखमी व मृतकांना चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविले.