भरधाव कार पुलावरून कोसळली, दोन जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 22:01 IST2018-04-22T22:01:55+5:302018-04-22T22:01:55+5:30
भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली.

भरधाव कार पुलावरून कोसळली, दोन जागीच ठार
नांदुरा - भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. जळगाव खा. येथील परिवारातील काही सदस्य मूर्तीजापूर येथे पारिवारिक कामानिमित्त गेले होते. दरम्यान, कार्यक्रम आटोपून जळगाव खानदेशकडे परतत असताना एमएच १९- बीजे ५६१४ या इंडिका कार चालकाचे वाहनावरून नियत्रंण सुटले. त्यामुळे ही कार पुलावरून ३० फूट खोल कोसळून झालेल्या अपघातात गाडीतील मागील सिटवरील सौ अलका वसंत नाले (५०) व सौ प्रांता अर्जुन कोळी ( ५२ ) या दोघी जागीच ठार झाल्या तर तर चालक अर्जुन कोळी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ खामगाव येथे हलविण्यात आले असून, याच कार मधील वसंत नाले यांना किरकोळ मार लागला आहे.
कठडे नसल्याने घडला अपघात!
महामार्गावरील ब-याच पुलांना कठड़े नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना नेमका अंदाज येत नाही. कोलासर जवळील या पुलाचेही कठड़े कधीचेच तूटलेले आहेत. राष्ट्रिय महामार्ग प्रशासनाकडे पुल जीर्ण झाल्याच्या तसेच कठडे नसल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाच्या हलागर्जीपणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अपघातात वाढ झाली आहे. तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. जुन्या पुलांची दुरूस्ती तसेच वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर आहे.
- राकेश जवादे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण