two dead in accident near khalegaon shivar buldhana | खळेगाव शिवारात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
खळेगाव शिवारात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

ठळक मुद्दे ट्रक व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.पघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मेहकर-सिंदखेड राजा मार्गावर लोणार तालुक्यातील खळेगाव शिवारात १४ जून रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. 

बुलडाणा - ट्रक व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मेहकर-सिंदखेड राजा मार्गावर लोणार तालुक्यातील खळेगाव शिवारात १४ जून रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. 

अपघातात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात येत असलेल्या पोटी येथील विलास पाटील, डिगांबर गावंडे या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ट्रक चालक या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जालन्याकडून भाजीपाला घेऊन एमएच-२९-एपी-००६४ क्रमांकाचे मालवाहू वाहन मेहकरकडे जात होते. दरम्यान, मेहकरकडून एमएच-०४-बीएस-९७९८ क्रमांकाचा ट्रक हा जालन्याकडे जात होता. दरम्यान, लोणार तालुक्यातील खळेगाव शिवारात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच सुलतानपूर पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी निवृत्ती सानप हे पहाटे दोन वाजता घटनास्थळी पोहोचले. जखमी ट्रक चालकाला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 
 


Web Title: two dead in accident near khalegaon shivar buldhana
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.