शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात तूर खरेदी केंद्र सुरु होणार

By admin | Updated: May 2, 2017 23:48 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करू: तहसीलदार काकडे यांची माहिती

मेहकर : नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा तसेच तुरीचा बारदाना नसल्याने मेहकर येथील तूर खरेदी केंद्र काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसात मेहकर येथील तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले. १ मे रोजी नाफेड अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ व महसूल अधिकारी यांची तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार संतोष काकडे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करीत होते. शेतकऱ्यांची खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने तसेच बारदाना नसल्याने गेल्या काही दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंद आहे. त्यामुळे शेतकरी परेशान झाले आहेत. जवळपास १९ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप करणे अजूनही बाकी आहे, तर खरेदी केलेली तूर ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर ठेवण्यात आली आहे. तूर खरेदी केंद्र लवकर सुरु व्हावे, यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे. मेहकर येथील खरेदी केलेली तूर आज व उद्या उचलून खामगाव येथे साठविण्यात यावी, तसेच उर्वरित तूर खरेदी करून त्याचे तत्काळ मोजमाप करावे, अशा सूचना तहसीलदार काकडे यांनी यावेळी दिल्या. तूर खरेदी ही २४ तास सुरू ठेवणे शक्य नाही, त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंतच तूर खरेदी केंद्र सुरु ठेवावे, नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर गर्दी होऊन गोंधळ होत आहे. यामुळे वाद-विवादसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे यापुढे तुरीचे मोजमाप हे पोलीस बंदोबस्तात करण्यात यावे, अशा सूचनाही तहसीलदार संतोष काकडे यांनी दिल्या आहेत. नाफेडचे तूर खेरदी केंद्रांवर खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने उघड्यावर अथवा मार्केट यार्डात तूर ठेवावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने खरेदी केलेली तूर लवकर न उचलल्यास तुरीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे खरेदी-विक्री संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सातबाराची खात्री करुनच मोजमाप करावेनाफेडच्या केंद्रावर काही व्यापारी शेतकऱ्यांची तूर बाहेर कमी भावात खरेदी करुन तीच तूर नाफेड केंद्रावर जादा भावाने विकत असल्याच्या तक्रारी येत असल्याने ज्या शेतकऱ्यांची तूर असेल त्याच शेतकऱ्यांचा सात-बारा असल्याची खात्री करुन प्रत्यक्ष शेतकरी हजर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तूर माल, सात-बारा, उत्पादन क्षमता पडताळून घेऊनच तुरीचे मोजमाप करावे, अशा सूचना तहसीलदार संतोष काकडे यांनी दिल्या.