मलकापूर-बुलडाणा मार्गावर ट्रक-बसचा अपघात, १५ प्रवाशी जखमी, सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 11:10 IST2021-09-19T11:08:55+5:302021-09-19T11:10:08+5:30

Accident News : मलकापूर- बुलडाणा मार्गावर मोहेगाव सकाळी घडली घटना.

Truck-bus accident on Malkapur-Buldana road, 15 passengers injured, six serious | मलकापूर-बुलडाणा मार्गावर ट्रक-बसचा अपघात, १५ प्रवाशी जखमी, सहा गंभीर

मलकापूर-बुलडाणा मार्गावर ट्रक-बसचा अपघात, १५ प्रवाशी जखमी, सहा गंभीर

ेताळा : भरधाव ट्रकने बसला दिल्याने १५ प्रवशी जखमी झाले. यापैकी पाच ते सहा जण गंभीर आहेत.ही घटना १९ सप्टेबर राेजी मलकापूर -बुलडाणा मार्गावर माेहेगाव जवळ घडली. बाेराखेडी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे उपचारासाठी हलवले. साेनाळा -बुलडाणा ही बस क्र एमएच १४ बीटी ४७५७ राजुर घाटासमाेरील माेहेगावजवळून येत हाेती. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक-बसमध्ये धडक झाली. यामध्ये १५ ते १६ प्रवाशी जखमी झाले. यापैकी ५ ते ६ जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या बाजुला उलटला.तसेच बसचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच बाेराखेडी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वृत्त लिहाेस्तवर गुन्हा दाखल झाला नव्हता़

Web Title: Truck-bus accident on Malkapur-Buldana road, 15 passengers injured, six serious