ट्रक-दुचाकीची धडक; तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 18:19 IST2019-05-26T18:19:01+5:302019-05-26T18:19:58+5:30
चांडोळ : येथील इरला मार्गावरील स्मशानभूमीनजीक ट्रकची व दुचाकीची धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रक-दुचाकीची धडक; तीन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
चांडोळ : येथील इरला मार्गावरील स्मशानभूमीनजीक ट्रकची व दुचाकीची धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. जखमीवर सध्या धाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
घाटाखालीली नांदुरा येथील गजानन राणुबा बोतुळे, अशोक कडुबा मोहरकर, प्रकाश उत्तम बोतुळे हे तिघे चांडोळ नजीक असलेल्या खासगाव येथे दुचाकीवर (एमएच-२१-बीई-६४८५) जात असताना चांडोळच्या जवळ स्मशानभूमी नजीक समोरून येणाºया ट्रकने एमएच-२०-एए-९०६७ ची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवरील उपरोक्त तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना तातडीने धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच ट्रक चालकास वाहनासह तेथेच अडवून नागरिकांनी रोष व्यक्त केला. या घटनेची वृत्त लिहीपर्यंत धाड पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. औरंगाबाद जिल्ह्यातील ट्रक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ट्रक चालकाचे नाव स्पष्ट झाले नाही.