शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

वृक्ष संवर्धनातून स्मृतीचे जतन; पर्यावरणपुरक रक्षाविसर्जन करून लावला वटवृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 6:17 PM

उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले.

- नवीन मोदे

धामणगाव बढे : स्वकीयाचा मृत्यू म्हणजे मनाला चटका लावणारी गोष्ट. परंतु, मृत्यू हेच जीवनाचे अंतीम सत्य आहे. अशाच दुखाच्या प्रसंगी पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांनी वडिलांच्या मृत्यूनंतर रूढी परिवर्तनाचा सामाजिक संदेश देत पर्यावरणपुरक अस्थी व रक्षाविसर्जन करीत त्याठिकाणी वटवृक्षाचे रोपटे लावले. त्यांच्या या कृतीचे समाजातील मान्यवरांनी कौतूक केले.पिंप्रीगवळी येथील पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कडूबा नारायण उबाळे (८४) यांचे २१ मे रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. आयुष्यभर त्यांनी वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला. त्यासाठी शेतात; तसेच घराच्या परिसरात अनेक झाडांचे संगोपन केले. २३ मे रोजी पिंप्रीगवळी येथे त्यांच्या अस्थी व रक्षा विसर्जनाचा (सावडण्याचा) विधी पार पडला. परंतु, वेगळ्या पध्दतीने त्यासाठी अस्थी व रक्षा विसर्जन नदीपात्रात न करता शेतामध्ये एका खडड्यात करण्यात आले व त्याठिकाणी समाजातील मान्यवरांचेहस्ते वटवृक्षाचे रोपटे लावण्यात आले. घरातील प्रिय व्यक्ती मृत्यूनंतरसुध्दा कधीही विस्मरणात जाऊ नये व शेवटच्या विधीमध्येसुध्दा पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी उबाळे कुटुंबीयांनी प्रत्यक्ष कृतीतून राबविलेली संकल्पना प्रेरणादायी आहे. त्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत झाले. त्यासोबत वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी आणखी २५ वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार कडुबा उबाळे यांचे पुत्र मारोती उबाळे यांनी केला. सर्वप्रथम जलसंपदा विभागात काम करणाºया स्व.कडुबा उबाळे यांचे नातु अंकीत चौथनकर यांनी ही संकल्पना मांडली व कुटुंबियांनी त्यास पाठबळ दिले. समाज परिवर्तनासाठी दिशादर्शक ठरणाºया या रक्षाविसर्जन कार्यक्रमाला दलितमित्र माधवराव हुडेकर, माजी आमदार सखाराम अहेर गुरूजी, डॉ. शिवशंकर गोरे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास चौथनकर, विष्णु उबाळे, गणपतराव अहेर, गजानन हुडेकर, सरोदे, अंबादास धोंगडे, बहुसंख्य समाज बांधव तथा मित्र, आप्तेष्ट उपस्थित होते. 

 परिवर्तनवादी विचारांची आज समाजाला गरज आहे. पिंप्रीगवळी येथील उबाळे कुटुंबियांचा आदर्श अनुकरणीय आहे. वृक्षसंवर्धनातून प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन ही लोकचळवळ बनावी यासाठी प्रयत्न करू.-डॉ.शिवशंकर गोरेसावता मंडळ, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocialसामाजिक