शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

खंडित विद्युत पुरवठा शेतक-यांच्या मुळावर !

By admin | Updated: December 22, 2014 00:45 IST

शेतकरी हैराण : रब्बी हंगाम धोक्यात.

मेहकर (बुलडाणा) : मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील शेतकरी सद्य:स्थितीत रब्बी हंगामा तील पिकांना वाचविण्यासाठी कृषी पंपाच्या साहाय्याने पिकांना पाणी देत आहेत; परंतु वारंवार खंडित होणारा शेतातील विद्युत पुरवठा शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. विद्युत पुरवठा सुरळीत राहत नसल्याने रब्बी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात असून, शेतकरी हैराण झाले आहेत.पावसाच्या हुलकावणीमुळे परिसरातील शेतकर्‍यांचा खरीप हंगाम हातचा निघून गेला. त्यामुळे खरिपातील कसर रब्बीत भरून काढण्याच्या तयारीत शेतकर्‍यांनी रब्बी पेरणी केली; परंतु ज्या शेतकर्‍यांकडे ओलि ताची सोय आहे, त्यांनीच गहू, हरभरा आदी पिकांचा पेरा केला. गहू, हरभरा शेतात डोलत असतानाच त्याला पाणी देणे गरजेचे झाले आहे. तर तूर पिकही शेंगा पक्वतेच्या अवस्थेत असून, तूर पिकालाही पाण्याची अत्यंत गरज निर्माण झालेली आहे. त्यासाठी शेतकरी कृषी पंपाच्या साहाय्याने रब्बी पिकाला रात्रंदिवस पाणी देत आहेत; परंतु शेतातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकाला पाणी देणे अवघड झाले आहे. वेळीच पिकाला पाणी मिळाले नाही, तर ही पिके सुकण्याच्या वाटेवर आहेत. विद्युत सुरळीत राहत नसल्याने रब्बीला पाणीही मिळत नाही. त्यामुळे रब्बी हंगाम महावितरणच्या दुर्लक्षामुळे धोक्यात सापडत आहे. तर शेतातील विद्युत रोहित्र बिघडल्यास वीज वितरणचे कर्मचारीही कित्येक दिवस फिरकून पाहत नसल्याने शेतकर्‍यांना वीज वितरण कार्यालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागत आहेत. याकडे लक्ष देऊन शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, अशी मागणी शे तकर्‍यांमधून होत आहे.