शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर चोरट्यांचे रॅकेट सक्रिय

By admin | Updated: February 5, 2015 01:16 IST

तीन चोरट्यांना अटक ; तीन ट्रॅक्टर जप्त.

बुलडाणा : मागील काही महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये सतत ट्रॅक्टर चोरीचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात होणार्‍या ट्रॅक्टर चोरीप्रकरणी बुलडाणा पोलिसांनी औरंगाबाद येथून तीन चोरट्यांना ४ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली आहे. या आरोपींनी जिल्ह्यातून सहा ट्रॅक्टरची चोरी केल्याची कबुली दिली असून, यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.मेहकर तालुक्यातील हिवराआश्रम येथील दत्तात्रय अशोक म्हस्के यांच्या मालकीचे ट्रॅक्टर चोरी गेल्याची तक्रार साखरखेर्डा पोलिसात २२ जानेवारी रोजी करण्यात आली होती. ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्रीमती र्श्‍वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बुलडाणा पोलीस स्टेशनस्तरावर पथके तयार करण्यात आली. या पथकांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सूर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनात ४ फेब्रुवारी रोजी रात्री औरंगाबाद येथून ज्ञानेश्‍वर रामराव नागरे (२३) रा.वेलतुरा जि.हिंगोली, बाबासाहेब पांडुरंग चव्हाण आणि रवींद्र देवराव पांदे दोघेही रा. चिखलठाणा ता.कन्नड जि.औरंगाबाद या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, हिवराआश्रम येथील ट्रॅक्टर आणि जिल्ह्यातून आणखी सहा ट्रॅक्टर चोरीची कबुली त्यांनी दिली.पोलीस पथकाने तिन्ही चोरट्यांकडून १८ लाख रुपये किमतीचे ३ ट्रॅक्टर ताब्यात घेतले, तर इतर ४ ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. ट्रॅक्टर चोरट्यांची टोळी सक्रिय असून, जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील अनेक ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या कारवाईत स.पो.नि. गोरखनाथ जाधव, नीलेश लोधी, सपोउपनि प्रकाश राठोड, केशव अक्तुरकर, राजू ठाकूर, केशव नागरे, सोनाजी दाभाडे, विजय दराडे, दीपक पवार, विलास साखरे, पोकाँ योगेश सरोदे, अमोल तरमळे, मोहम्मद जाकीर, सुभाष साळोख आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.